दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांच्या एका चित्रपटात एक गाणे होते, जे एकेकाळी पुष्कळ गाजले होते, ‘लबाड लांडगं ढोंग करतंय, लगीन करायचं सोंग करतंय, ढोंग करतंय.’ गेल्या आठवड्यातील ३ बातम्या वाचून मला नेमके हे गाणे आठवले. नाशिकमध्ये ‘टी.सी.एस्.’सारख्या नामवंत बहुराष्ट्रीय आस्थापनाच्या कार्यालयात काम करणार्या तरुण हिंदु मुलींना काही मुसलमान सहकार्यांकडून फसवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले जात होते आणि त्यांच्यावर धर्मपरिवर्तनाचा दबाव आणला जात होता. गेली अनेक मास हा प्रकार आस्थापनेत चालू होता आणि मानव संसाधन विभागाकडे (‘एच्.आर्.’कडे) तक्रार केली, तरी त्या तक्रारीला केराची टोपली दाखवली जात होती; कारण ‘एच्.आर्.’ व्यवस्थापकही एक हिजाबी बाई होती.
दुसरी केस अमरावतीच्या परतवाड्यातील. एका १९ वर्षांच्या अत्यंत फाटक्या आणि छपरी दिसणार्या अयान अहमद तन्वीर नावाच्या मुसलमान पोराने ११ वी-१२ वीत शिकणार्या अल्पवयीन हिंदू मुलींना समाजमाध्यमांवरून ‘टार्गेट’ (लक्ष्य) करून त्यांना पुणे-मुंबईला लॉजवर नेले, त्यांच्याशी अश्लील चाळे करून त्याचे व्हिडिओ बनवले आणि ते वापरून या मुलींचा तो उपभोग घेत राहिला. एक नाही, दोन नाही, तब्बल १८० अल्पवयीन हिंदु मुलींना या मवाली दिसणार्या पोराने नादी लावले होते. त्या स्वखुशीने त्याच्यासह लॉजवर राहिल्या होत्या.
तिसरी बातमी आहे ‘लेन्सकार्ट’ कंपनीची. पियुष बन्सल नावाच्या हिंदु माणसाच्या या आस्थापनाचे म्हणे धोरण (पॉलिसी) होते की, त्यांच्या दुकानात काम करणार्या लोकांनी हिजाब (डोके आणि मान झाकायचे वस्त्र) घातला, तर काही हरकत नाही; पण बिंदी, सिंदूर, टिळा आणि हातात बांधलेला भगवा धागा मात्र निषिद्ध होता. या तीनही बातम्या एकाच आठवड्यातील आहेत आणि तिन्हींमध्ये पीडित हिंदू बायका आहेत अन् गुन्हेगार मुसलमान ! तरीही, तरीही आपण सर्वसामान्य हिंदु लोक या बातम्या वाचतो आणि ‘मला काय त्याचे’, असे म्हणून आपल्या कामाला तरी लागतो किंवा ‘हे राजकारण आहे’, असे म्हणून भ्रमणभाष खाली तरी ठेवतो.
१. हिंदु स्त्रियांना ‘जाणीवपूर्वक लक्ष्य’ करण्यात येणे

या तीनही प्रकरणांत एक समान धागा आहे, जाणीवपूर्वक हिंदु स्त्रियांना ‘टार्गेट’ करणे आणि त्यांची धार्मिक ओळख मिटवणे. कुठे कार्यालयामध्ये थट्टा मस्करीच्या नावाखाली हिंदु स्त्रियांच्या श्रद्धेचा अपमान, कुठे अल्पवयीन मुलींचे पद्धतशीर लैंगिक शोषण, तर कुठे कपाळावरची बिंदी ‘प्रोफेशनल’ (व्यावसायिक) नाही; म्हणून काढण्याचा आदेश. हिजाब ‘प्रोफेशनल’ असतो; पण बिंदी मात्र ‘प्रोफेशनल’ नसते. अर्थात् याला हिंदु स्त्रियाही तितक्याच उत्तरदायी आहेत. त्या फाटक्या अंगाच्या; एक फुंकर मारली, तरी उडून जाईल, अशा छपरी अयानसह त्या १८० मुली स्वखुशीने लॉजवर गेल्या होत्या. त्यांची आक्षेपार्ह छायाचित्रे त्यांनी स्वतःहून काढून दिली, काही छायाचित्रांमध्ये त्या चक्क हसत आहेत. ‘टी.सी.एस्.’मधील हिंदु मुली त्यांच्या मुसलमान सहकार्याचा अत्याचार सहन करत राहिल्या. ‘लेन्सकार्ट’मधील एकाही हिंदु कर्मचारी स्त्रीने हे विचारायचे धाडस दाखवले नाही, ‘हिजाब चालतो, तर मग बिंदी का नाही ?’
२. हिंदूंनी उदारमतवादी प्रतिमा जपल्याचा परिणाम
लबाड लांडगे ढोंग करणारच. तो त्यांचा स्वभाव आहे; पण हिंदू मुली / स्त्रिया अशा शेळीसारख्या बिनडोकपणे का वागतात ? हे लिहितांनाही मला राग येत आहे; पण त्याहीपेक्षा अधिक वेदना होत आहे. त्या १८० मुलींपैकी एखादी १५-१६ वर्षांची मुलगी तुमच्या किंवा माझ्या नात्यातील, शेजारची, ओळखीतील असू शकते. ‘टी.सी.एस्.’मधील त्या नोकरदार स्त्रिया आपल्या शेजारी असू शकतात. जोपर्यंत आपण या विषयावर बोलणे टाळत राहू, तोपर्यंत अशी पुढची बातमी येत राहील.
हिंदु मुली / स्त्रियाच अशा का वागतात ? याचे उत्तर शोधायचे असेल, तर हिंदु घरातून काय चालले आहे, ते पहा. आपण आपल्या मुलींना शिकवतो ‘स्वतंत्र व्हा.’ चांगलेच आहे; पण त्यासह ‘लबाड लांडग्यांपासून सावध रहा !’, हे मात्र स्पष्टपणे सांगायला आपण कचरतो; कारण कुणी आपल्याला ‘जुनाट म्हणेल, ‘कम्युनल’ (सांप्रदायिक) म्हणेल’, अशी हिंदु पालकांना भीती वाटते. गेली काही वर्षे हिंदु समाजाने हिंदु मुलींच्या सुरक्षेपेक्षा स्वतःची उदारमतवादी प्रतिमा जपणे निवडले. परिणाम आपल्या समोर आहेत; पण ते आपण स्वीकारूच इच्छित नाही; कारण आपल्याला समाजातील ‘लिबरल’ (उदारमतवादी) गाढव बनायचे असते ना !
३. हिंदु समाज जागा कधी होणार ?
घटका भरली तिथे तरी बी
भटजी मिळं ना कुठं हो
भटजी मिळं ना कुठं
आगावू गाढव ताडकन उठं हो
टिपत गातं, मंतार म्हणतं
टिपत गातं, मंतार म्हणतं
भोकाड पसरूण व्हंग करतंय, ढोंग करतंय
लबाड लांडगं ढोंग करतंय
धडधडीत अशा बातम्या प्रत्येक आठवड्याला येत असतांनाही हिंदूंमधीलच एक मोठा वर्ग ‘सेक्युलर’ (निधर्मी) बनण्यात धन्यता मानतो. ते लबाड लांडग्याचे दलाल गाढव बनण्यात पटाईत असतात. मला कधी कधी प्रचंड उद्विग्न वाटते. प्रत्येक आठवड्याला वृत्तपत्रामध्ये अशा बातम्या येत असतात.
हिंदू मुली स्वखुशीने लांडग्यांमागून जाणार्या निर्बुद्ध शेळ्या बनायला सिद्ध असतात आणि लबाड लांडगे त्यांचा यथेच्छ फराळ करून ढेकर देत पुढच्या शेळीच्या मागावर जातात. हिंदु समाज नावाचे वर्हाड ? गाण्यातीलच कडवे आठवते परत,
मांडव झाला वसाड सारा
पळत सुटलं व्हराड
पळत सुटलंय व्हराड
लांडगा शेळीचा करतोय फराळ
गेली शेकडो वर्षे हे विषारी लबाड लांडगे हिंदू शेळ्यांचा फराळच करत आहेत. प्रश्न हा आहे की, हिंदु समाजाची ‘स्वयंमेवमृगेंद्रता’ (स्वतःच्या पराक्रमाने राजा (सिंह) होणे) कधी जागी होणार ? कधी आपण एक समाज म्हणून पेटून उठणार ?
– सौ. शेफाली वैद्य, प्रसिद्ध लेखिका, पुणे. (१७.४.२०२६)

तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?