शासनाच्या विविध योजनांमुळे शेतकर्यांना नवे बळ आणि नवा आत्मविश्वास

सिंधुदुर्ग – शासनाच्या विविध योजनांमुळे शेतकर्यांना नवे बळ आणि नवा आत्मविश्वास मिळत आहे. विशेषतः कृषी यांत्रिकीकरण योजनेमुळे शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळत आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा अधिक आत्मनिर्भर, सक्षम आणि समृद्ध होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. या अंतर्गतच जिल्ह्यातील ३३२ शेतकऱ्यांना सरकारकडून ७ कोटी २३ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्यात आले आहे.
Sindhudurg Development Story: 332 Farmers Empowered with ₹7.23 Crore! 🌱
योजनेची वैशिष्ट्ये
१. कृषी यांत्रिकीकरण योजनेचा मुख्य उद्देश शेतकर्यांना कृषी यांत्रिकीकरणासाठी प्रोत्साहन देणे आणि दर्जेदार कृषी अवजारे अनुदानावर उपलब्ध करून देणे हा आहे. ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोपवाटिका यंत्र, फवारणी यंत्र, तसेच इतर आधुनिक साधनांच्या खरेदीसाठी शासनाकडून आर्थिक साहाय्य दिले जात आहे.
२. जिल्ह्यात या योजनेच्या अंतर्गत सुमारे ८ सहस्र लाभार्थ्यांना १७ कोटी रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे. त्यामुळे शेतीची उत्पादकता वाढण्यास साहाय्य झाल्याने शेतकरी अधिक सक्षम होत आहेत.
३. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळ https://krishi.maharashtra.gov.in/ याला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री