
मुंबई – अभिनेत्री चाहत खन्ना यांनी वर्ष २०२४ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत धर्मांतर केल्याविषयी कोणताही पश्चाताप नसल्याचे म्हटले होते. आता त्या पुन्हा ‘सनातन’ धर्मात परतल्या आहेत. चाहत यांनी म्हटले आहे, ‘‘सुदैवाने जेव्हा मी पुन्हा माझ्या सनातन धर्माच्या मुळांकडे परतले, तेव्हा मला अनेक गोष्टींमागचे सत्य उमगले. ‘मी धर्मांतर करावे’, अशी अनेकांची इच्छा नव्हती; पण मला निकाह (विवाह) करायचा होता; म्हणून मी ते केले. मुसलमान पती फरहान मिर्झा याने माझा बुद्धीभेद केला होता. संशय घेणे, विविध आरोप करणे, मारहाण आणि अश्लील शिविगाळ, लैंगिक आणि मानसिक छळ, तसेच आर्थिक हानी याने मी त्रासले होते.’’ (धर्मांधांचे खरे स्वरूप जाणा ! – संपादक)
🚨 Actress Chahatt Khanna says she has returned to Sanatan Dharma after a painful marriage experience.
She alleged facing suspicion, abuse, harassment, assault, and financial loss during her relationship with Farhan Mirza. She also said she felt manipulated into conversion for… pic.twitter.com/uBkc2KkNdR
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 18, 2026
वर्ष २०१८ मध्ये चाहत खन्ना यांनी लैंगिक आणि मानसिक छळाचे कारण देत घटस्फोटासाठी अर्ज प्रविष्ट केला होता. चित्रीकरणाच्या वेळी तिचा पती यायचा आणि सहकलाकारासमवेतचे चित्रीकरण आक्षेपार्ह वाटून तो गोंधळ घालायचा. तिच्यावर पाळत ठेवली जायची. दोन्ही मुलींना समवेत घेऊन जाण्याची अनुमती नव्हती, असेही चाहत यांनी माध्यमांना सांगितले.
चाहत खन्ना यांनी म्हटले, ‘‘तुझ्या देवांची पूजा करू नकोस, ते योग्य नाही, असे मला सांगण्यात आले. आणि एका भरकटलेल्या मुलाप्रमाणे मी त्या मार्गावर चालत गेले; पण आता मी आनंदी आहे. पुष्कळ चांगल्या स्थितीत आहे. मी त्यातून शिकले. आता काय योग्य, काय अयोग्य, हे मला समजत आहे आणि मी आता अतिशय सजग आयुष्य जगत आहे. घटस्फोटानंतर मला माझ्या मूळ धर्मात परत येण्यासाठी बराच वेळ लागला.’’
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
एस्.टी.च्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त परिवहनमंत्र्यांकडून राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ !
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक