सामायिक भूमीतील पोट हिस्सा मोजणीचे काम करण्यासाठी मागितली लाच

लाच मागितल्याच्या प्रकरणी सावंतवाडीत भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचार्‍यावर गुन्हा नोंद

प्रतिकात्मक चित्र

सावंतवाडी – येथील भूमी अभिलेख कार्यालयातील परिरक्षण भूमापक ओमकार सुरेंद्र आपटे (वय ३३ वर्षे) यांनी लाच मागितल्याच्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सिंधुदुर्ग शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे. या प्रकरणी आपटे यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सामायिक भूमीतील पोट हिस्सा मोजणीचे काम पूर्ण करून देण्यासाठी आपटे यांनी प्रारंभी २० सहस्र रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तडजोडीअंती ही रक्कम १० सहस्र रुपये निश्चित करण्यात आली, अशी तक्रार १३ एप्रिल २०२६ या दिवशी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कुडाळ कार्यालयात प्रविष्ट केली होती. त्यानंतर कारवाई करण्यात आली. ही कारवाई विभागाचे ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, तसेच अपर पोलीस अधीक्षक भागवत मोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग शाखेचे पोलीस उपअधीक्षक विजय पांचाळ, पोलीस निरीक्षक दीपक माळी यांच्या पथकाने केली.

संपादकीय भूमिका

भ्रष्टाचार होत नाही, असे एकतरी क्षेत्र आहे का ?