
सांगली, १७ एप्रिल (वार्ता.) – ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या (राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद) इतिहासविरोधी आणि मनमानी निर्णयाचा निषेध करण्यासाठी सांगली येथे श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने १ मे या दिवशी भव्य ‘मराठा साम्राज्य सन्मान’ राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे यांसह विविध सरदारांचे वंशज आणि इतिहास संशोधक यांना निमंत्रित करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष श्री. नितीन चौगुले यांनी दिली.
श्री. नितीन चौगुले म्हणाले की, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान प्रतिवर्षी ‘हिंदवी स्वराज्य सेनेचा पराक्रम विश्वाला सांगणारी मोहीम’ आयोजित करते. यापूर्वी पानिपत, गोवळकोंडा, सुरत आणि गोमंतक (गोवा) या ठिकाणी संघटनेने मोहिमेचे आयोजन केले आहे. श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानसह इतिहास संशोधक, शिक्षणतज्ञ आणि विविध सामाजिक संघटना यांनी ‘एन्.सी.इ.आर्.टी.’च्या इयत्ता ८ वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून वर्ष १७५९ चा मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा वगळण्याच्या निर्णयाचा निषेध केला आहे.
श्री. नितीन चौगुले पुढे म्हणाले की, वर्ष १७५९-१७६० या कालखंडात मराठा साम्राज्याने उत्तर भारतात अटकेपार झेंडे लावून प्रभावी वर्चस्व प्रस्थापित केले होते. राजस्थान, माळवा, बुंदेलखंड, देहली आणि पंजाबपर्यंत मराठ्यांचे अधिराज्य होते. याचे पुरावे पेशवे दप्तर, तहपत्रे, महसूल नोंदी आणि समकालीन अभिलेख यांमध्ये स्पष्ट आहेत. कोणताही सल्लामसलत न करता घेतलेला हा निर्णय शैक्षणिकदृष्ट्या त्रुटीपूर्ण आणि घटनाविरोधी आहे.
वर्ष १७५९ चा मराठा साम्राज्याचा नकाशा पाठ्यपुस्तकात तात्काळ पुनर्स्थापित करावा, इतिहासकारांची स्वतंत्र समिती नेमावी आणि केंद्र सरकारने यात तात्काळ हस्तक्षेप करून स्पष्टीकरण द्यावे. जर या मागण्या अमान्य झाल्या, तर १ मेच्या मोर्च्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येईल. प्रसंगी सरकारविरुद्ध न्यायालयीन लढा उभारण्याची चेतावणीही श्री. चौगुले यांनी दिली आहे.
Waqf Board Scam : समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळात ‘वक्फ बोर्डा’च्या भूमींमध्ये अब्जावधी रुपयांचा घोटाळा ! – मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !