उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. स्वानंदी रोहन घटवाई ही या पिढीतील एक आहे !
‘कु. स्वानंदी हिची तिची आई आणि आजी यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१. जन्मापूर्वी
अ. ‘मी गर्भारपणी १० माळा ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करत होते. मी सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या आवाजातील भजने ऐकत होते. त्यामुळे मला संपूर्ण ९ मास कोणताही त्रास झाला नाही.
आ. गर्भारपणात मी ६ मास कार्यालयात जात होते. मला सतत ‘माझ्याभोवती संरक्षककवच आहे’, असे जाणवत असे. त्यामुळे मला कधीही थकवा जाणवला नाही.
आनंदी, उत्साही आणि साधकांशी जवळीक साधणारी ५३ टक्के आध्यात्मिक पातळीची पिंपळे सौदागर, पुणे येथील कु. स्वानंदी रोहन घटवाई (वय ६ वर्षे) !

१. ‘स्वानंदी नेहमी आनंदी आणि उत्साही असते. तिचे डोळे बोलके आहेत.
२. ती साधनेसंदर्भातील प्रश्न जिज्ञासेने विचारते. ती नम्रतेने प्रश्न विचारते.
३. स्वानंदी प्रेमळ आहे. तिच्या घरी २ लहान पक्षी आहेत. त्यांची ती विशेष काळजी घेते.
४. तिची आजी सौ. अपर्णा घटवाई यांनी सांगितलेले साधनेचे प्रयत्न ती मनापासून करण्याचा प्रयत्न करते.
५. ती प्रथम भेटीतच साधकांशी जवळीक साधून त्यांना आपलेसे करते.
६. एकदा ती, तिचे बाबा श्री. रोहन घटवाई आणि मी असे आम्ही एका सेवेसाठी जात होतो. प्रवासात वाहतुकीच्या कोंडीमुळे अधिक वेळ लागला. त्या वेळी तिला भूक लागली होती, तरीही ती शांत होती. तिने आमच्याकडील खाऊ शांतपणे खाल्ला आणि नंतर काही त्रास दिला नाही.’
– (पू.) सौ. मनीषा पाठक (सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत, वय ४४ वर्षे), पुणे (४.३.२०२६)
२. जन्म ते ३ मास
२ अ. सात्त्विकतेची आवड
१. स्वानंदी १ मासाची असतांना रात्री लवकर झोपत नव्हती. माझ्या सासूबाई तिला मांडीवर घेऊन नामजप आणि स्तोत्र म्हणत असत. ते ऐकत असतांना ती शांत झोपत असे.
२. तिला प.पू. भक्तराज महाराजांची भजने, श्रीरामाचा नामजप आणि श्रीरामाचा पाळणा ऐकायला पुष्कळ आवडत असे.
३. स्वानंदी २ मासांची असतांना तिला दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये येणारे प.पू. गुरुदेवांचे ( सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) छायाचित्र दाखवल्यावर त्याकडे पाहून ती आवाज करत असे. तेव्हा ‘जणू ती त्यांच्याशी बोलत आहे’, असे मला वाटत होते.

३. वय ४ ते ६ मास
३ अ. नामजपादी उपाय केल्यावर शांत होणे : माझ्या सासूबाईंनी स्वानंदीसाठी नामजपादी उपाय करण्यास आरंभ केल्यावर ती रडत असे. त्यांनी तिला मांडीवर घेऊन नामजपादी उपाय केल्यावर ती शांत होत असे. तिला मोरपिसाने त्रासदायक आवरण काढलेले आवडते.
४. वय २ ते ३ वर्षे
४ अ. स्वानंदी दोन वर्षांची असतांना लादीवर पडलेली रांगोळी हाताने पसरवत होती. तेव्हा मला त्यात ॐ चे चिन्ह दिसले.
५. वय ३ ते ४ वर्षे
५ अ. देवाची आवड
१. ती शाळेत जाण्याच्या मार्गात एक दत्तमंदिर आहे. ती त्या मंदिरात जाऊन त्या देवाला नमस्कार करून मगच शाळेत जाते.
२. तिच्या शाळेत श्री गणपति, श्री लक्ष्मी आणि श्री सरस्वती या देवतांच्या मूर्ती आहेत. स्वानंदी प्रतिदिन घरातून निघतांना मूर्तीला वहाण्यासाठी फुले घेऊन जाते.
५ आ. पुण्यातील पानशेतजवळ आंबी या गावी ‘देवी दत्त मठ’ (नृसिंह सरस्वती महाराज यांचा मठ) आहे. आम्ही तिथे जातो. एक दिवस आम्ही मठात गेलो होतो. तिथून निघतांना तिच्या हातावर एक फूलपाखरू बसले. आम्ही घरी येईपर्यंत ते फूलपाखरू तिच्या हातावर बसले होते.’
– सौ. ऋचा रोहन घटवाई (कु. स्वानंदीची आई), पिंपळे सौदागर, पुणे.
६. वयाच्या ५ वर्षांनंतर
अ. ‘मी अत्तर आणि कापूर यांचे उपाय करत असतांना स्वानंदीही अत्तर अन् कापूर यांचे उपाय करते.
आ. तिला स्वतःची चूक लक्षात आल्यावर ती लगेच मान्य करते.
इ. मी व्यष्टी साधनेचा आढावा देत असतांना ती शांतपणे बसून ऐकते.
– सौ. अपर्णा घटवाई (कु. स्वानंदीची आजी, वडिलांची आई, वय ६४ वर्षे), पिंपळे सौदागर, पुणे.
७. कु. स्वानंदीचे स्वभावदोष : हट्टीपणा’
– सौ. ऋचा रोहन घटवाई (कु. स्वानंदीची आई), पिंपळे सौदागर, पुणे. (२७.२.२०२५)
हसतमुख आणि सर्वांशी सहजतेने जवळीक साधणार्या चि.सौ.कां. गुलाबी धुरी !
उत्साही आणि सेवेची तळमळ असलेले चि. संदीप गवंडी अन् इतरांना साहाय्य करणार्या आणि देवाच्या अनुसंधानात असलेल्या चि.सौ.कां. भाग्यश्री हडकर !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले शिरोडा, गोवा येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !
स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या आणि तळमळीने अन् भावपूर्ण सेवा करणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मधु मेहता !
साधकांचा आधारस्तंभ असलेल्या आणि भजनांतून देवाला आळवणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या नागपूर येथील कै. (सौ.) जयश्री क्षीरसागर (वय ७१ वर्षे) !