पाटलीपुत्र (बिहार) – भाजपचे नेते सम्राट चौधरी यांनी बिहारचे २४ वे मुख्यमंत्री म्हणून १५ एप्रिलला शपथ घेतली. राज्यपाल सय्यद अता हसनैन यांनी येथील लोक भवनात त्यांना पद आणि गोपनीयता यांची शपथ दिली. या वेळी संयुक्त जनता दलाचे विजय चौधरी आणि बिजेंद्र यादव यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार हाती घेतला.
मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांचे वडील शकुनी चौधरी या वेळी म्हणाले की, कधीकधी देवाची कृपा असते. आम्ही अनेक पक्षांसाठी जीवापाड संघर्ष केला; पण आम्हाला यश आले नाही. आज अमित शहा, नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या आशीर्वादाने सम्राट पुढे गेले आहेत. कष्टाचे फळ मिळतेच. जे कठोर परिश्रम करतात, त्यांचीच प्रगती होते.

‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्र : २१व्या शतकातील जागतिक समृद्धी आणि सुरक्षा यांची चावी !
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी