बीड – शहरातील गांधीनगर पेठ भागात टंकलेखनाच्या शिकवणीवर्गाला जाणार्या २ सख्ख्या बहिणींचा भररस्त्यात विनयभंग करून त्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली. पीडित १६ वर्षीय तरुणी आणि तिची २० वर्षीय बहीण स्कूटीवरून जिल्हा स्टेडियमकडे जात असतांना अल कबीर हॉलजवळ अकबर याकूब कुरेशी याने दुचाकी आडवी लावून त्यांना अडवले. त्याने तरुणीची ओढणी ओढून तिचा हात धरला आणि तिच्या मनाला लज्जा वाटेल असे बोलला. पीडित मुलीने नकार दिल्यावर आरोपीने तिच्या कानाखाली मारली. मोठ्या बहिणीने हस्तक्षेप केल्यावर तिलाही मारहाण केली. त्यानंतर त्या पीडित मुलींनी आरडाओरड केल्यानंतर नागरिक जमा होताच आरोपीने ‘ही घटना कुणाला सांगितली तर जीव घेईन’, अशी धमकी देऊन पळून गेला. घटनेनंतर दोन्ही बहिणींनी घरी जाऊन कुटुंबियांना माहिती दिली आणि नातेवाइकांसह पेठ बीड पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. यानुसार अकबर याकूब कुरेशी याच्याविरुद्ध विनयभंग, मारहाण आणि धमकी दिल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील अन्वेषण चालू आहे.
बीडमध्ये रस्त्यावर दोन बहिणींचा मुसलमानाकडून विनयभंग !
संपादकीय भूमिका
छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात धर्मांधांकडून वारंवार युवतींचा विनयभंग होणे, हे पोलिसांना लज्जास्पद ! पोलीस त्यांची निष्क्रीयता केव्हा सोडणार ?

मोहरमच्या मिरवणुकीत सहस्रो लोकांना ठार मारण्याच्या कारस्थानामागील समाजविघातक प्रवृत्ती !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन
सोलापूर येथील वैष्णवी मंदिर परिसरातील महाकाय वटवृक्ष आगीपासून वाचला !
पुणे येथे अधिवक्ता एस्.के. जैन यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ !