उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. गार्गी पवार ही या पिढीतील एक आहे !
‘सातारा येथील कु. गार्गी पवार हिच्याविषयी तिच्या आईला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

‘वर्ष २०२२ मध्ये ‘कु. गार्गी पवार उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची आध्यात्मिक पातळी ५६ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२६ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ५८ टक्के झाली आहे. तिच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, तिची साधनेची तळमळ आणि तिच्यातील भाव यांमुळे आता तिची साधनेत प्रगती होत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (३.४.२०२६)
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी वहीत नामजप लिहून त्याचे छायाचित्र पाठवण्यास सांगणे
‘२९.१२.२०२४ या दिवशी सातारा येथे एका कार्यक्रमासाठी पू. (सौ.) मनीषा पाठक (सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत, वय ४४ वर्षे) आल्या होत्या. तेव्हा त्यांनी गार्गीला प्रतिदिन १ पान नामजप लिहून त्याचे छायाचित्र त्यांना पाठवायला सांगितले. तेव्हापासून गार्गी प्रतिदिन नामजप लिहू लागली.
२. नामजप लिहिण्याची ओढ निर्माण होणे
आरंभी काही दिवस गार्गीला ‘पू. ताईंनी वहीत नामजप लिहून त्याचे छायाचित्र काढून पाठवायला सांगितले आहे’, अशी आठवण करून दिल्यावर ती नामजप लिहीत असे. काही दिवसांनी आम्ही तिला न सांगताही ती नामजप लिहू लागली. ती प्रतिदिन सकाळी शाळेत जाण्यापूर्वी अथवा संध्याकाळी न विसरता नामजप लिहीत असे. तिला हळूहळू नामजप लिहिण्याची ओढ निर्माण झाली.
३. पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी कौतुक करून प्रोत्साहन देणे
काही शिबिरे, सोहळा किंवा अन्य कार्यक्रमानिमित्त पू. मनीषाताई सातार्यात येत असत. त्या वेळी पू. मनीषाताईंनी गार्गीने नामजप लिहिलेली वही पाहून तिला खाऊ दिला आणि तिचे कौतुक केले. त्यातून तिला प्रोत्साहन आणि सकारात्मक ऊर्जा मिळाली.
व्यष्टी साधना मनापासून करणारी आणि शांत राहून प्रत्येक परिस्थिती स्वीकारणारी सातारा येथील ५८ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. गार्गी पवार (वय १० वर्षे) !

१. ‘कु. गार्गी व्यष्टी साधना मनापासून करते. एकदा मी तिला सांगितले, ‘‘तू नामजप नियमित लिहिण्याचा प्रयत्न करू शकतेस.’’ तेव्हापासून तिने प्रामाणिकपणे नामजप लिहिण्यास आरंभ केला.
२. गार्गी तिच्या आईसह शिबिरे आणि सत्संग याठिकाणी आल्यावर शांतपणे नामजपादी उपाय करते.
३. ती तिच्या आई समवेत सेवेला जाते. तिच्या घरापासून त्या सेवेच्या ठिकाणी पोचण्यास वेळ लागतो. तेव्हा ती चिडचिड न करता शांत राहून परिस्थिती स्वीकारते.’
– (पू.) सौ. मनीषा पाठक (सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत, वय ४४ वर्षे), पुणे (२४.२.२०२६)
४. नामजप लिहिण्यास विसरल्याचे लक्षात आल्यावर प्रायश्चित्त घेणे

एके दिवशी गार्गीकडून नामजप लिहायचा राहिला. तेव्हा मी तिला सांगितले, ‘‘संतांनी सांगूनही तू कृती केली नाहीस, तर त्यांचा अवमान केल्यासारखे होईल. या चुकीचे प्रायश्चित्त म्हणून तू १ आठवडा दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील कार्यक्रम पाहू नकोस.’’ एक दिवस गार्गी दूरचित्रवाणी वाहिनीवरील कार्यक्रम पहात होती. मी तिला १० मिनिटांनी तिची चूक लक्षात आणून दिली. मी तिला सांगितले, ‘‘तू आता २ दिवस ‘चॉकलेट’ खाणार नाही’’, असे प्रायश्चित्त घे.’’ तेव्हा तिने ३ दिवस ‘चॉकलेट’ न खाण्याचे प्रायश्चित्त घेतले. त्या कालावधीत १ दिवस तिला शाळेत ‘चॉकलेट’ मिळाले, तरीही तिने ‘चॉकलेट’ न खाता घरी आणले. वर्ष २०२५ मध्ये तिच्याकडून ५ वेळा नामजप लिहायचा राहिला. त्याबद्दल तिने प्रत्येक वेळा प्रायश्चित्त घेतले.
५. नामजपाचे गांभीर्य
अ. गार्गीला बाहेर कुठेही जायचे असल्यास ती स्वतः आठवणीने समवेत न्यायच्या पिशवीत नामजपाची वही आणि अन्य साहित्य ठेवते.
आ. वर्ष २०२५ मध्ये गोवा येथे झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त मी सेवा करत असतांना गार्गी वही आणि पेन घेऊन नामजप लिहीत होती. त्या वेळी आम्ही रहात असलेल्या ठिकाणी अन्य बालसाधकही होते. त्यांनाही तिने नामजप लिहिण्यास सांगितले.
इ. ती कुठे नातेवाइकांकडे कार्यक्रमाला गेल्यावर रात्री घरी येण्यास उशिर झाला, तरीही ती घरी आल्यावरही नामजप लिहून पूर्ण करते.
ई. माझ्या सासरकडच्या व्यक्ती आणि अन्य नातेवाईक साधना करत नाहीत. आम्ही त्या नातेवाइकांच्या घरी गेल्यावरही ती तिचा नामजप लिहून पूर्ण करते.
उ. काही जण तिला विचारतात, ‘‘तू अभ्यास करत आहेस का ?’’ त्यांनी असे विचारल्यावर गार्गी त्यांना ‘‘मी दत्तगुरूंचा नामजप लिहीत आहे’’, असे ठामपणे सांगते.
ऊ. ऑक्टोबर २०२४ मध्ये गार्गीला सलग ३ – ४ दिवस १०३ ते १०४ डिग्री सेल्सिअस ताप येऊन ती थंडीने कुडकुडत होती. तिच्या अंगावर २ ‘ब्लँकेट’ घालूनही तिची थंडी न्यून होत नव्हती. तिला पुष्कळ अशक्तपणा आला होता. असे असूनही ती प्रत्येक दिवशी नामजप लिहीत होती. ‘तिने नामजप लिहिल्यामुळे तिला रुग्णाईत स्थितीतही आध्यात्मिक बळ मिळाले’, असे मला वाटले.
६. सातत्याने नामजप लिहिल्याने गार्गीत जाणवलेले पालट आणि तिला झालेले लाभ
६ अ. अक्षर सुधारणे : आरंभी गार्गीचे हस्ताक्षर चांगले नव्हते. तिला सांगूनही त्यात पालट हाेत नव्हता. एक दिवस पू. (सौ.) मनीषाताई सातारा येथे आल्यावर त्यांनी साधकांना ‘गार्गी नियमित नामजप लिहीत आहे’, असे सांगून तिच्या वहीचे छायाचित्र साधकांना दाखवले. मी घरी आल्यानंतर गार्गीला त्याविषयी सांगितले. तेव्हा ती म्हणाली, ‘‘माझे हस्ताक्षर चांगले नाही’, हे पाहून त्यांना काय वाटले असेल ? तू वेळोवेळी सांगूनही मी ऐकले नाही.’’ त्या वेळी तिच्या बोलण्यात खंत जाणवत होती. आता तिच्या हस्ताक्षरात पूर्वीच्या तुलनेत पुष्कळ सुधारणा झाली आहे.
६ आ. चुकांविषयी संवेदनशील : गार्गीमध्ये ‘राग येणे, हट्टीपणा आणि तुलना करणे’ हे स्वभावदोष अधिक प्रमाणात होते. तिने नामजप लिहायला आरंभ केल्यापासून तिच्यामधील हे स्वभावदोष काही प्रमाणात उणावले आहेत. आता तिला स्वतःच्या चुका लक्षात येतात. ती क्षमायाचनाही करते.
६ इ. अनिष्ट शक्तींचा त्रास अल्प होणे : वर्ष २०२४ पर्यंत गार्गीला ‘अनिष्ट शक्ती दिसणे, अनिष्ट शक्ती तिला दुखापत करत आहेत’, असे जाणवणे’, असे त्रास होत असत. त्या वेळी तिला संतांकडून नामजपादी उपाय मिळाल्यामुळे तिचा त्रास उणावत असे. कालांतराने तिला पुन्हा काहीतरी वेगळा त्रास चालू होत असे. आता तिने नामजप लिहायला आरंभ केल्यापासून तिला अनिष्ट शक्ती दिसत नाहीत आणि तिचे अन्य त्राससुद्धा न्यून झाले आहेत.
‘गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आणि पू. मनीषाताई यांच्या कृपेमुळेच गार्गीमध्ये पालट होत आहेत. तिचे नामजप लिहिण्यातही सातत्य टिकून आहे’, त्याबद्दल मी गुरुदेव आणि पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्या चरणी शरणागतभावाने कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. शिल्पा पवार (कु. गार्गीची आई), सातारा (१०.१२.२०२५)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
घरात आश्रमाची अनुभूती देणारे पलूस (सांगली) येथील बर्गे कुटुंबीय !
साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काळानुसार साधकांना करायला सांगितलेला ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करत असतांना साधक अनुभवत असलेली भावस्थिती !
दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची चौकट वाचतांना श्रीराम आणि हनुमान यांच्यामधील अद्वैताच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
‘दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचनाने वाचकांना झालेले लाभ
साधक नामजप करत असतांना त्याला भगवान शिवाच्या अस्तित्वाची आलेली अनुभूती