पणजी येथील ‘गोवा बुक फेस्टिवल २०२६’मधील सनातनच्या ग्रंथप्रदर्शन कक्षाला भेट दिलेल्या मान्यवरांचे अभिप्राय !

‘४ ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत बांदोडकर मैदान, पणजी येथे प्रथमच ‘गोवा बुक फेिस्टवल’चे आयोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन कक्ष लावण्यात आला होता. या कक्षावर सनातनचे ‘मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड आणि गुजराती’ या भाषांतील ग्रंथ ठेवले होते. या कक्षाला भेट दिलेल्या मान्यवरांचे अभिप्राय पुढे दिले आहेत.

१. सौ. सुलक्षणा प्रमोद सावंत (गोव्याच्या मा. मुख्यमंत्र्यांची पत्नी), शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या, गोवा.

‘गोवा पुस्तक महोत्सवा’त सनातन संस्थेचा ग्रंथप्रदर्शन कक्ष पाहून मला आनंद झाला. या कक्षावर विविध विषयांवरील ग्रंथ पहायला मिळतात. सर्वांनी सनातन संस्थेच्या ग्रंथकक्षाला भेट देऊन या अनमोल ग्रंथांचा लाभ घ्यावा.’

२. श्री. योगेश करीकुर्वे, फाऊंडर, हॅप्पिनेस फॅक्ट्री वेलनेस, मुंबई.

‘मी भारतात आणि विदेशात ‘हॅप्पिनेस’विषयी कार्यशाळा (वर्कशॉप) घेतो. त्यामध्ये ‘नृत्य, कला, नाटक, योग’, आदी विविध प्रकार असतात. मला नामस्मरण आणि प्राणायाम हे विषय आवडतात. सनातन संस्थेच्या ग्रंथातून मला नामस्मरणाविषयीची वैज्ञानिक परिभाषेतील माहिती मिळाली. आपण ‘दिवा लावणे’ आदी धार्मिक कृती करतो. त्या कृतींचा आपल्या जीवनावर कोणता परिणाम होतो ?’ अशा प्रकारची सखोल माहिती या ग्रंथांमध्ये आहे. हे ग्रंथ लहान असल्याने ते वाचायला सोपे पडतात. येथील विविध विषयांवरील ग्रंथ पाहून मला पुष्कळ आनंद झाला. येथे अनेक कक्ष (स्टॉल) आहेत; मात्र सनातन संस्थेचा हा कक्ष सर्वांपेक्षा वेगळा आहे. इतरांनीही सनातनच्या ग्रंथकक्षाला भेट द्यावी !’

३. कवयित्री सौ. ज्योती कुंकळीकर, कोकणी साहित्यिका, गोवा.

‘महोत्सवात आतापर्यंत मी बरेच ग्रंथकक्ष (स्टॉल्स) पाहिले; परंतु सनातनच्या ग्रंथकक्षाचे वेगळेच वैशिष्ट्य आहे. सध्याच्या वैज्ञानिक युगात मुलांना वैज्ञानिक परिभाषेत माहिती सांगावी लागते. ‘कपाळावर कुंकू लावणे, अलंकार परिधान करणे’ इत्यादी सर्व विषयांची शास्त्रोक्त माहिती सनातनच्या ग्रंथात आहे. मी काही ग्रंथ विकत घेतले आहेत. येथे येऊन मला आनंद झाला. सर्वांनी सनातनच्या ग्रंथांचा लाभ घ्यावा !’

४. श्री. शंतनु गुप्ता, साहित्यिक आणि चित्रपट पटकथाकार, देहली.

‘सनातनचे ग्रंथ १३ भाषांमध्ये प्रकाशित केलेले आहेत आणि १ कोटी ग्रंथ घरोघरी पोचले आहेत’, हे कळल्यावर मला पुष्कळ आनंद झाला. या ग्रंथांमध्ये मनुष्य जीवनातील प्रत्येक पैलूविषयीची माहिती आहे. ‘जन्म, लग्न, मृत्यू, मृत्यूनंतरचे क्रियाकर्म, काय खावे ? कसे वागावे ?’, आदी सर्व विषयांवरील शास्त्रोक्त माहिती सनातनच्या या ग्रंथांत आहे. प्रत्येक ग्रंथात केवळ माहिती नाही, तर वैज्ञानिक परिभाषेतील माहिती आणि शास्त्र सांगितले आहे.’

५. विद्यावाचस्पती डॉ. मेधा खाजगीवाले, हिप्नोथेरपिस्ट आणि व्याख्यात्या, पुणे. (यांनी ‘मृत्यू आणि आत्मा’ यांवर ‘पी.एच्.डी.’ केली आहे)

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विविध विषयांवर जे ग्रंथ लिहिले आहेत, त्यामध्ये भरपूर ज्ञान आहे. ‘विविध उपचारपद्धती, सोळा संस्कार, अग्निहोत्र, देवीची रूपे, वेगवेगळ्या प्रकारे करायच्या प्रार्थना, श्राद्धविधी’, आदी विविध विषयांच्या संदर्भातील शास्त्रोक्त माहिती आणि प्रत्येक कृतीचे महत्त्व या ग्रंथांतून दिले आहे. येथे येऊन मला पुष्कळ आनंद मिळाला.’