बंगालमध्ये न्यायिक अधिकार्यांना ओलीस ठेवल्याचे प्रकरण

नवी देहली – बंगालमधील मालदा जिल्ह्यात १ एप्रिल या दिवशी विशेष सखोल पुनरावलोकन प्रक्रियेच्या वेळी ७ न्यायिक अधिकार्यांना घेराव घालून त्यांना ओलीस ठेवण्यात आले होते. या प्रकरणाची नोंद घेत सर्वोच्च न्यायालयाने या कृत्यामागे असलेल्या व्यक्तींचा राजकीय संबंध आहे का ?, याची माहिती मागितली आहे. न्यायालयाने म्हटले की, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि ते तर्कसंगत निष्कर्षापर्यंत नेले जाईल.
यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे दिले आहे. यंत्रणेच्या अंतरिम अहवालात अटक करण्यात आलेल्या व्यक्तींचा तपशील नमूद करण्यात आला असून पुढील टप्प्यात या प्रकरणामागील संभाव्य राजकीय संबंध उघड होण्यावर न्यायालयाचे लक्ष केंद्रित आहे.
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक