संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ला विरोध करणारी याचिका फेटाळली !

बेंगळुरू (कर्नाटक) – शाळांमध्ये प्रतिदिन ६ कडव्यांसह संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ म्हणण्याचा केंद्र सरकारचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने ग्राह्य ठरवला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाला घटनाविरोधी घोषित करण्याची मागणी करणारी याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळून लावली.
Karnataka High Court upholds Centre’s decision to recite ‘Vande Mataram’ in schools !
Petition against the entire 'Vande Mataram' rejected ! pic.twitter.com/W4hTiBZca2
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 13, 2026
बेंगळुरूचे अधिवक्ता सोमशेखर यांनी प्रविष्ट (दाखल) केलेल्या या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती विभू बाखरू यांच्या नेतृत्वाखालील खंडपिठासमोर सुनावणी झाली. केंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अरविंद कामत यांनी बाजू मांडली. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने अशाच प्रकारची विनंती करणारी याचिका फेटाळली आहे, हे त्यांनी खंडपिठाच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली.
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !