
१. चित्रकार राजा रवि वर्मा यांच्या ‘यशोदा-कृष्ण’चित्राची १६७ कोटी २ लाख रुपयांमध्ये विक्री !
‘भारतीय परंपरेतील थोर चित्रकार राजा रवि वर्मा यांचे ‘यशोदा आणि कृष्ण’ हे प्रसिद्ध चित्र १६७ कोटी २ लाख रुपयांना विकले गेले. लिलावात केवळ ७ मिनिटे बोली लागली आणि प्रसिद्ध उद्योगपती सायरस पूनावाला यांनी ही कलाकृती विक्रमी किमतीत खरेदी केली. भारतीय कला विश्वातील हा एक ऐतिहासिक विक्रम समजला जात आहे. त्यांनी या कलाकृतीकडे केवळ वैयक्तिक संग्रह म्हणून न पहाता ‘राष्ट्रीय ठेवा’ म्हणून पाहिले. वर्ष १८९० मध्ये काढलेले हे चित्र आहे. या चित्रात माता यशोदा आणि बाळकृष्ण यांच्यातील भावनिक नात्याचा सुंदर क्षण टिपला आहे. या चित्रात प्रकाश आणि सावलीचा अप्रतिम वापर आहे. कला तज्ञांच्या मते ‘ही कलाकृती भारतीय कलेतील ‘मोनालिसा’सारखी (मोनालिसाचे चित्र जगविख्यात असून त्याचे मूल्य कोट्यवधीचे आहे.) समजली जाते. या विक्रमी विक्रीमुळे भारतीय कला बाजाराला मोठी चालना मिळाल्याचे म्हटले जात आहे. ही कलाकृती वेळोवेळी सर्वसामान्यांसाठी प्रदर्शित केली जाईल’, असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या या खरेदीला भारतीय कला बाजारासाठी मोठी कामगिरी समजली जात आहे.

२. १३६ वर्षांपूर्वी काढलेल्या कलाकृतीतील मूल्य ओळखणारे उद्योगपती सायरस पूनावाला !
‘यशोदा आणि कृष्ण’ ही कलाकृती वर्ष १८९० च्या दशकातील असून भागवत पुराणातील एका प्रसंगावर आधारित आहे. चित्राच्या विक्रमी विक्रीमुळे भारतीय कलेला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळेल, तसेच कला ही केवळ सौंदर्य नव्हे, तर एक सबळ गुंतवणूक म्हणूनही समोर येत आहे. भविष्यात अशा विक्रीमुळे कला बाजारात नवे विक्रम घडण्याची शक्यता आहे, असे तज्ञांचे मत आहे. या घटनेने एक चांगली गोष्ट घडली. यापूर्वी विकृत धर्मांध चित्रकार हुसेन यांचे ‘ग्राम यात्रा’चे चित्र ११८ कोटी रुपयांना विकले गेले होते. त्यामुळे त्यांच्या नावावर असलेला सर्वोच्च बोलीचा विक्रम आता क्षणात संपला आहे.
हे एक अनोखे चित्र, जे प्रत्येक भारतियाच्या मनात बाळकृष्णाविषयी असलेले उत्कट प्रेम दर्शवते. अशा १३६ वर्षांपूर्वी काढलेल्या कलाकृतीतील कला ओळखणारे सायरस पूनावाला हे अध्यात्म, कला आणि राष्ट्र्रभक्ती अशा गुणांनी युक्त आहेत, असे म्हणावे लागेल. अशा सुपुत्रांना जन्म देणारी भारतभूमी धन्य आहे.’
श्रीकृष्णार्पणमस्तु ।
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय (५.४.२०२६)
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?