भारतीय सैन्याचा निर्णय

मुंबई – मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटका झालेले कर्नल प्रसाद पुरोहित यांची ‘ब्रिगेडियर’पदी पदोन्नती करण्यास भारतीय सैन्याने संमती दिली आहे.
From 17-Year Ordeal to Honour Restored 🚩
After a 17-year legal battle, Shrikant Prasad Purohit cleared for Brigadier rank.
His career remained frozen since 2008 after arrest in the Malegaon blast case.After acquittal, his path is now restored. Armed Forces Tribunal halted… https://t.co/vtbKiajK97 pic.twitter.com/ndKKXif0gP
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 10, 2026
१. कर्नल पुरोहित ३१ मार्च २०२६ या दिवशी सैन्यसेवेतून निवृत्त झाले होते; मात्र पदोन्नतीच्या मागणीसाठी त्यांनी ‘सशस्त्रसेना न्यायाधिकरणा’कडे दाद मागितली होती.
२. याचिकेवर सुनावणी करतांना न्यायाधिकरणाने त्यांच्या निवृत्तीला स्थगिती दिली होती.
३. पदोन्नतीच्या प्रक्रियेवर निर्णय होईपर्यंत त्यांना सेवेत कायम ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता.
४. न्यायाधिकरणाचा हस्तक्षेप आणि सैन्य स्तरावरील तांत्रिक प्रक्रिया यांच्यानंतर कर्नल पुरोहित यांना ‘ब्रिगेडियर’ पद देण्याचे अंतिम झाले.
वर्ष २००८ मधील मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात त्यांना अटक झाली. ते ९ वर्षे कारागृहात होते. वर्ष २०१७ मध्ये त्यांना जामीन मिळाला. त्यानंतर ते पुन्हा सैन्यसेवेत रुजू झाले होते. ३१ जुलै २०२५ या दिवशी मुंबईतील विशेष एन्.आय्.ए. न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केले. वर्ष २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन संमत केला होता.
जोगेश्वरीमध्ये ११ लाख रुपयांचा विनालेबल साबण जप्त !
महाराष्ट्र विधीमंडळ स्वीकारणार केंद्रशासनाने विकसित केलेली ‘एकात्मिक डिजिटल प्रणाली’ !
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक