रेल्वे सुरक्षा बलाच्या सैनिकांनी वर्षभरातील कामगिरी
हरवलेल्या ३० मुलांनाही घरी पोचवले !

रत्नागिरी – कोकण रेल्वेच्या मार्गावर कार्यरत असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या सैनिकांनी गेल्या वर्षभरात प्रवासादरम्यान रेल्वेमध्ये विसरलेले ५३ लाख रुपयांचे सामान प्रवाशांना परत केले आहे, तसेच ३० हरवलेल्या मुलांना त्यांच्या आई-वडिलांकडे सुखरूप पोचवण्याची कामगिरीही पार पाडली आहे.
१. कोकण रेल्वेमार्गावर दिवसभरात ३० हून अधिक गाड्या धावतात. या गाड्यांमधील प्रवासी आणि त्यांच्या सामानाच्या सुरक्षिततेचे दायित्व रेल्वे सुरक्षा बलाच्या सैनिकांवरती असते.
२. या धावत्या गाड्यांमध्ये, तसेच फलाटांवर (प्लॅटफॉर्मवर) रेल्वे सुरक्षा बलाचे सैनिक गस्त घालतात आणि लोकांच्या सुरक्षित प्रवासाचे दायित्व घेतात. अनेक वेळा प्रवासी उतरतांना स्वतःचे सामान विसरून जातात. गेल्या वर्षभरात कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागात अशा १४१ घटना समोर आल्या आहेत. या सगळ्या घटनांमधून कोकण रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने तब्बल ५३ लाख ६ सहस्र ७७६ रुपयांचे सामान, मौल्यवान वस्तू प्रवाशांना परत मिळवून दिल्या आहेत.
३. रेल्वे प्रवासात अनेक वेळा लहान मुले हरवतात. अशा ३० मुलांना त्यांच्या आई- वडिलांपर्यंत सुरक्षित पोचवण्याचे काम गेल्या वर्षभरात रेल्वे सुरक्षा बलाने केले आहे. यामध्ये २६ मुलगे आणि ४ मुलींचा सहभाग आहे.
४. प्रवासात चुकीचे वर्तन करून अन्य प्रवाशांना त्रास देणार्या व्यक्तीही अनेक असतात. गेल्या वर्षभरात विनाकारण गाडीची साखळी ओढून रेल्वे प्रवास विस्कळीत करणार्या ७५ जणांवर कारवाई करत रेल्वे सुरक्षा बलाने ४८ सहस्र रुपयांचा दंड वसूल केला आहे.
५. गोव्यातून कोकण रेल्वेच्या माध्यमातून नेल्या जाणार्या अवैध दारू वाहतुकीवर ही रेल्वे सुरक्षा बलाने कारवाई केली आहे. मागील वर्षभरात सुरक्षा बलाने ३८ वेळा अवैध दारू पकडली गेली असून ५ लाख ७२ सहस्र रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला आहे.
६. रत्नागिरीत रेल्वे सुरक्षा बलाकडून रेल्वे ॲक्ट अंतर्गत विविध ६४५ गुन्हे नोंद करण्यात आले असून ५ लाख ७६ सहस्र रुपयांचा दंड करतांना १० आरोपींना स्थानिक पोलिसांच्या कह्यात दिले आहे.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !