भाजपशासित राज्यांत मुसलमानांना लक्ष्य केले जात असल्याचे विधान केल्याचे प्रकरण

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – भाजपशासित राज्यांमध्ये मुसलमानांना लक्ष्य केले जात असून राज्यघटनेची पायमल्ली होत आहे, असे विधान करणार्या एका व्यक्तीवर नोंदवण्यात आलेला गुन्हा रहित करण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे. ‘अशा प्रकारच्या विधानांमुळे समाजात द्वेष पसरू शकतो आणि सार्वजनिक शांतता भंग होऊ शकते’, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने या वेळी नोंदवले.
न्यायमूर्ती प्रशांत कुमार यांच्या खंडपिठाने या प्रकरणाची सुनावणी करतांना सांगितले की,
१. राज्यघटनेने दिलेले भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे अमर्याद नाही. देशातील कायदा आणि सुव्यवस्था, तसेच सामाजिक सलोखा धोक्यात येईल, असे विधान करण्याचे स्वातंत्र्य कुणालाही नाही.
२. एखाद्या विशिष्ट समुदायाबद्दल भीती किंवा द्वेष निर्माण होईल, अशी विधाने करणे हे प्रथमदर्शनी गुन्हेगारी कृत्य ठरू शकते.
३. या प्रकरणात अन्वेषण चालू असून प्रथमदर्शनी गुन्हा घडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कनिष्ठ न्यायालयात चालू असलेल्या कायदेशीर प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण नाही.
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !