
१. अमृतस्नानासाठी जात असतांना ‘वातावरणात देवतांचे आशीर्वाद आणि शक्ती प्रवाहित होत आहे’, असे जाणवणे
‘२.२.२०२५ या वसंतपंचमीच्या दिवशी मी अमृतस्नान करण्यासाठी जातांना ‘वातावरणात कसला तरी सुगंध दरवळत आहे’, असे मला जाणवले. तसेच अमृतस्नान करण्याच्या स्थानाकडे जात असतांना ‘वातावरणात देवतांचे आशीर्वाद आणि शक्ती प्रवाहित होत आहे’, असेही मला जाणवले.
२. थंडीमुळे अंघोळ केली नसतांनाही एका जिज्ञासू समवेत बोलल्यानंतर पुष्कळ उत्साहवर्धक आणि हलके वाटणे
एकदा रात्री ११.३० वाजता प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आलेल्या एका जिज्ञासू व्यक्तीशी मी बोलत होतो. पुष्कळ थंडी असल्यामुळे मी प्रतिदिन अंघोळ करत नव्हतो. त्या दिवशीही मी अंघोळ केली नव्हती. जिज्ञासू व्यक्तीच्या समवेत बोलणे संपल्यानंतर मला पुष्कळ उत्साहवर्धक आणि हलके वाटत होते. जणू ‘मी नुकतीच अंघोळ केली आहे’, असे मला वाटत होते.
३. विमानातून प्रवास करतांना सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे स्मरण होऊन त्यांच्याशी अनुसंधान साधले जाणे
मी वाराणसीहून विमानाने गोव्याला प्रवास करत होतो. विमान आकाशात उड्डाण करत असतांना सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे स्मरण होऊन माझे त्यांच्याशी अनुसंधान साधले गेले. महाकुंभ मेळ्याच्या ठिकाणी मी ज्या काही सेवा केल्या, त्या वेळी आलेल्या अनुभूती मला आठवल्या आणि माझा कृतज्ञताभाव जागृत झाला. सेवेतील अन्य साधकांनी मला जे प्रेम दिले, त्याचे स्मरण होऊन माझे अंतःकरण भारावून गेले.
मी पूर्णतः या स्थितीत गढून गेलो होतो. तेवढ्यात माझ्या शेजारी बसलेल्या एका व्यक्तीने मला सांगितले, ‘‘पहा ! खिडकीतून तुम्ही प्रयागराज पाहू शकता !’’ त्या वेळी ‘मला प्रयागराजचे पुन्हा एकदा दर्शन घडवण्यासाठीच सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी त्या व्यक्तीच्या माध्यमातून माझ्याशी संवाद साधला आणि यातून ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव कोणाच्याही माध्यमातून बोलू शकतात’, असे मला जाणवले. आदल्या दिवशीच सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी मला सर्वांमध्ये गुरुरूप पहाण्याविषयी मार्गदर्शन केले होते. त्यामुळे ‘शेजारी बसलेल्या व्यक्तीच्या माध्यमातून सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवच मला विमानातून प्रयागराजचे दर्शन घेण्यास सांगत आहेत’, असे मला जाणवले.’
– श्री. ऑरित्रो मल्लिक, फोंडा, गोवा. (१५.२.२०२५)
हिंदु राष्ट्रात भक्तीभाव असलेल्या भक्तांकडेच मंदिरांचे दायित्व असेल !
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।
आनंदी आणि संत अन् गुरुदेव यांच्याप्रती भाव असलेला ५८ टक्के आध्यात्मिक पातळीचा भोसरी (पुणे) येथील कु. समीहन (कान्हा) संदीप कुलकर्णी (वय ७ वर्षे) !
प.पू. गजानन महाराजांनी साधकाला प्रत्यक्ष दर्शन देऊन श्री गुरुचरित्राचे पारायण करण्यास सांगणे आणि ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच प.पू. गजानन महाराज यांच्या रूपात दर्शन दिले’, असे वाटणे
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !