‘शेंडी कापू नये’ न्यायालयाचे आदेश
येरवडा कारागृहामध्ये पाठवणी !

पुणे – दैवी शक्तीचा संचार असल्याची बतावणी करून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी ऋषीकेश वैद्य याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. वैद्य याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला लष्कर न्यायालयात उपस्थित केले. न्यायालयाच्या आदेशानुसार वैद्य यांची येरवडा कारागृहात पाठवणी केली.
वैद्य यांच्या विरोधात एका महिलेने वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. संबंधित तक्रार पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्यात पुढील अन्वेषणासाठी सोपवण्यात आल्यानंतर पोलिसांनी वैद्य याला अटक केली होती.
पोलिसांकडून पुढील अन्वेषणासाठी अजून पोलीस कोठडी हवी असल्याचा युक्तीवाद सरकारी अधिवक्ता आणि अन्वेषण अधिकार्यांनी केला. त्याला वैद्य यांच्याकडून अधिवक्ता साजिद शहा, दिगंबर देसाई आणि पवन कुलकर्णी यांनी विरोध केला.
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा
जोगेश्वरीमध्ये ११ लाख रुपयांचा विनालेबल साबण जप्त !
‘डॉ. डी.वाय. पाटील बी-स्कूल’मध्ये आर्थिक अपव्यवहार प्रकरणी माजी संचालकाच्या विरोधात गुन्हा नोंद !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास सुमारे ५६ लाख रुपयांच्या सोन्याच्या पादुका दान !
पुणे येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पावन तपोभूमीचे अस्तित्व अवैध उत्खननामुळे धोक्यात !