बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांचे व्हिडिओ प्रसारित केल्यामुळे कारवाई केल्याचा गोतिए यांना संशय !

नवी देहली – प्रसिद्ध लेखक आणि पत्रकार फ्रान्सुआ गोतिए यांनी त्यांचे फेसबुक खाते कायमचे हटवण्यात (डिलीट) आल्याचे म्हटले आहे. त्यांनी ‘एक्स’वर याविषयी माहिती दिली आहे. गोतिए यांच्या मते, त्यांनी बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसेच्या संदर्भातील व्हिडिओ प्रसारित केल्यानंतर त्यांच्या खात्यावर कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या सूत्रावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
My @facebook which had 2 lakhs friends got permanently deleted coz I published a film of lynching of #Hindus in #Bangladesh. My @instagram got deleted twice for no reason except I am pro Hindu. Are there #Muslims in @Meta censor board? pic.twitter.com/L7p4CzV6f0
— François Gautier (@fgautier26) April 5, 2026
गोतिए यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे की, त्यांचे अनुमाने २ लाख मित्र असलेले फेसबुक खाते अचानक हटवण्यात आले. तसेच त्यांनी नमूद केले की, त्यांचे इन्स्टाग्राम खाते यापूर्वी २ वेळा हटवण्यात आले होते. या संदर्भात गोतिए यांनी सामाजिक माध्यमांच्या नियंत्रणावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
🚨 @Meta has deleted the @facebook / @instagram accounts of renowned journalist @fgautier26
Gautier suspects the action was taken because he shared videos of atrocities against Hindus in Bangladesh.
This exposes the Hinduphobic nature of social media platforms like Meta, which… pic.twitter.com/RwplgquJu9
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 7, 2026
यापूर्वी ‘यू ट्यूब चॅनल’ आणि ‘ट्विटर’ खाते करण्यात आले होते बंद !
गोतिए यांच्या सामाजिक माध्यम खात्यांवर यापूर्वीही कारवाई झाल्याच्या घटना आहेत. वर्ष २०२१ मध्ये त्यांचे ‘ट्विटर’ खाते निलंबित झाले होते, तर वर्ष २०२४ मध्ये त्यांचे यू ट्यूब चॅनल हटवण्यात आले होते.
‘मेटा’कडून प्रतिक्रिया नाही
फेसबुकची मालकी असणार्या ‘मेटा’ आस्थापनाकडून या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. सामान्यतः समुदाय नियमांचे उल्लंघन, संवेदनशील अथवा हिंसक सामुग्री यांसारख्या कारणांमुळे खाती हटवली जातात.
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
Vistara_Airlines : विस्तारा एअरलाईन्सला ग्राहक आयोगाकडून १ लाख रुपयांचा दंड
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा