‘पंढरपूर कॉरिडॉर’ आणि उजनी जलपर्यटनाला प्राधान्य ! – कार्तिकेयन एस्., जिल्हाधिकारी, सोलापूर

कार्तिकेयन एस्., जिल्हाधिकारी, सोलापूर

(कॉरिडॉर म्हणजे सुसज्ज आणि प्रशस्त मार्ग)

सोलापूर – जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ‘पंढरपूर कॉरिडॉर’ प्रकल्प, आयटी पार्क (माहिती तंत्रज्ञान आस्थापनांसाठी सिद्ध केलेला विशेष परिसर) आणि उजनी धरणातील जलपर्यटन विकासाला प्राधान्य देऊ. ‘पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या सेवेसह जिल्ह्याच्या विकासासाठी काम करण्याची संधी मिळणे’, हे माझे भाग्य आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकास प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देणार आहे. ‘सोलापूरच्या प्रगतीसाठी १०० नव्हे, तर १००० टक्के प्रयत्न करू’, असे प्रतिपादन नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस्. यांनी केले. ते पदभार स्वीकारल्यावर पत्रकारांशी बोलत होते.