ग्रेनेड पाकमधून पाठवण्यात आल्याचा संशय
चंडीगड – येथील भाजपच्या कार्यालयावर फेकण्यात आलेल्या ग्रेनेडच्या प्रकरणात पंजाब पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने रूपनगरच्या मोरिंडा परिसरातून अमन सिंह उपाख्य भोलू आणि गुरतेज सिंह यांना अटक केली आहे. ते रत्तनगड गावचे रहिवासी आहेत. या आरोपींना निधी आणि निर्देश कुठून मिळाले, याचा शोध पोलीस घेत आहेत. या आक्रमणाचे दायित्व खलिस्तानी आतंकवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या सुखजिंदर सिंह बब्बर याने स्वीकारली आहे. ग्रेनेडच्या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.
सुरक्षायंत्रणांना संशय आहे की, फेकण्यात आलेला ग्रेनेड पाकमधून ड्रोनद्वारे भारतात पाठवण्यात आला होता.

काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
Suhail Arrested : श्रीराममंदिर बाँबने उडवून देण्याचा कट रचणार्या सुहेल याला कर्नाटकमधून अटक
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
पनवेल येथील ७ गायींच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
मयंक लोहार हत्याप्रकरणी सरकार विधानसभेत निवेदन करणार !