|

मुंबई – मुंबईतील सर्व शाळांमध्ये मनाच्या श्लोकांचे पठण केले जावे, अशी सूचना ठाकरे पक्षाच्या नगरसेविका आणि माजी महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. याविषयी ठराव सूचना त्यांनी सादर केली होती. ९ एप्रिल या दिवशी होणार्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा ठराव चर्चेसाठी येणार आहे. या मागणीला मनसेने पाठिंबा दिला आहे; मात्र ‘एम्.आय.एम्.’ने (‘ऑल इंडिया मजेलिस-ए-इत्तेहादुल मुसलीमीन’ने) मात्र याला विरोध दर्शवला आहे.
याविषयी माध्यमांशी बोलतांना सौ. किशोरी पेडणेकर म्हणाल्या, ‘‘मनाच्या श्लोकांमुळे मुलांवर चांगले संस्कार होतील. यातून देशाची भावी पिढी उदयाला येईल. जाती, धर्म, पंथ यांच्या पलीकडे जाऊन मनावर चांगले संस्कार होण्यासाठी मनाचे श्लोक आवश्यक आहेत. आम्ही शाळेत असतांना मनाच्या श्लोकांच्या स्पर्धा होत होत्या. मनाच्या श्लोकांमुळे अधिकार आणि कर्तव्ये यांची जाणीव निर्माण होऊन त्यातून चांगले अधिकारीही घडतील.’’
वाद निर्माण करण्याचा प्रयत्न !
‘एम्.आय.एम्.’ने मनाचे श्लोक शाळांमध्ये शिकवण्याला विरोध दर्शवला आहे, याविषयी पत्रकारांनी विचारले असता सौ. किशोरी पेडणेकर म्हणाल्या, ‘‘डॉ. आंबेडकर यांचे बालपण पाहिले, तर त्यांच्यावर मनाच्या श्लोकांचा परिणाम दिसतो. मनाच्या श्लोकांचा पगडा असल्यामुळे ते राज्यघटना देऊ शकले.’’
हे वादग्रस्त वक्तव्य असल्याची वृत्ते माध्यमांवरून आल्यावर सौ. किशोरी पेडणेकर यांनी डॉ. आंबेडकर आणि मनाचे श्लोक यांचा संबंध जोडल्याविषयी क्षमा मागितली. ‘मनाचे श्लोक विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होण्यासाठी शिकवले जाणे आवश्यक आहेत’, असे त्यांनी म्हटले. मनसेचे गटनेते श्री. यशवंत किल्लेदार यांनी शाळेत मनाचे श्लोक शिकवले जाण्याची मागणी योग्य असल्याचे म्हटले आहे.
संपादकीय भूमिकाशाळांमध्ये मनाचे श्लोक शिकवण्यासाठी विरोध करणार्या ‘एम्.आय.एम्.’ला खडसावणे आवश्यक ! |
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
‘खालिद के शिवाजी’ हिंदुविरोधी चित्रपट ‘ओटीटी’वर प्रदर्शित !
‘लाडकी बहीण योजने’तील ९२ लाख चुकीच्या लाभार्थ्यांना वगळले !
लोकलमधील वातानुकूलन यंत्र १५ मिनिटे बंद; प्रवासी गुदमरले, महिला बेशुद्ध !