श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या दैवी वाणीतून भक्तीसत्संगात स्रवलेले अमृतबिंदू !

१. संत तुलसीदासांनी सांगितलेले सत्संगाचे महत्त्व
संत तुलसीदासांनी म्हटले आहे, ‘एक घडी आधी घडी, आधी की पुनी आध । तुलसी संगत साधू की, हरे कोटि अपराध ।’ म्हणजे ‘अर्ध्याच्याही अर्धी घटिका, म्हणजे केवळ ५ – ६ मिनिटांचा संत सहवास किंवा सत्संग जरी आपल्याला लाभला, तरी आपले अनंत अपराध नष्ट होतात.’
२. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी अनेक वर्षांपासून साधकांना सत्संगाची विविध माध्यमे दिली आहेत. हे सर्व सत्संग साधकांच्या उद्धारासाठीच आहेत. गुरुकृपायोगानुसार अष्टांग साधनेच्या अष्टदल-कमलाची, ‘सत्संग’ ही एक सुंदर पाकळी आहे. सत्संगांमुळे आपली कितीतरी पापे, केवढे तरी प्रारब्ध नष्ट होते. त्यामुळे सत्संगाविषयी असणारे मनाचे अडथळे दूर करून सत्संगांचा मनापासून लाभ घेण्यासाठी तळमळीने प्रयत्न करावेत. सत्संगात सांगितली जाणारी सूत्रे मनःपूर्वक ऐकून हृदयात कोरून ठेवावीत.
३. सत्संगांच्या माध्यमातून भगवंताची दैवी वाणी कार्यरत असते. दिसतांना माध्यम जरी वेगळे दिसत असले, तरी त्यांच्या वाणीमधून भगवंताची, गुरुदेवांची वाणी कार्यरत असते. त्या वाणीतील दैवी शक्ती शब्दांच्या पलीकडील असते. त्या ‘वाणीचे चैतन्य’ हृदयात उतरत असते. ज्याच्यात ऐकण्याची तळमळ आहे, त्याच्यासाठी भगवंताची दैवी वाणी चैतन्यासह प्रवाहित होऊन त्या चैतन्याचा स्पर्श अंतःकरणाला होतो. त्यामुळे साधकांनी सत्संगांमधील सूत्रे मनापासून ऐकण्यासाठी ‘शुद्ध ग्रहणशक्ती’ ठेवावी.
४. सत्संगांमध्ये केवळ शब्दांतून नव्हे, तर शब्दांच्या पलीकडल्या चैतन्याचा लाभ आपल्याला होत असतो. ती दिव्य ऊर्जा आपल्या अंतर्मनात प्रवाहित होत असते. आपल्याला सत्संगातील प्रत्येक शब्द हृदयापासून ऐकून त्या शब्दांच्या पलीकडील चैतन्यही अनुभवता आले पाहिजे. त्यामुळे आपल्याला स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही स्तरांवर लाभ होईल. यासाठीच भगवद्कृपेने लाभत असलेल्या सर्व सत्संगांना नियमित आणि वेळेत उपस्थित रहाण्यासह, त्यातील सर्व सूत्रे मनापासून ऐकावीत. ती सूत्रे स्वतःकडे लिहून घेऊन त्यांवर मनन चिंतन करावे. यातून निश्चितच आपले परम कल्याण होणार आहे.
५. श्रवणाचा खरा अर्थ
एखाद्या सत्संगात अनेक जण विषय ऐकत आहेत. त्यातील काही जणांनाच श्रवणाचा खरा लाभ होतो. श्रवण सर्व जण सारखेच करतात; परंतु प्रत्येक जण त्याचे मनन करत नाहीत. त्यामुळे सर्वांना सारखे फळ मिळत नाही. लक्षपूर्वक न केलेले श्रवण, संशयी मनाने केलेले श्रवण आणि मन इकडे तिकडे भरकटत असतांना केलेले श्रवण काहीही फळ देत नाही. गुरुवचनांवर विश्वास ठेवून, अंतःकरणात नम्रता ठेवून, मनातील विकार आणि विचारांवर मात करून एकाग्र चित्ताने श्रवण केले, तरच श्रवणाचे फळ मिळते.’
साधकांनो, गुरुकृपेने आपल्याला लाभत असलेल्या सत्संगांमध्ये जी सूत्रे सांगितली जातात, ती ‘गुरुवचन’ मानून निष्ठापूर्वक ऐका. त्या गुरुवचनांवर श्रद्धा ठेवून मनातील विकार आणि विचार यांवर मात करून एकाग्र चित्ताने ऐका. या नरदेहाचा उद्धार होण्यासाठी श्री गुरुकृपेने लाभत असलेल्या सत्संगांचा लाभ करून घ्या !
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (२८.२.२०२६)
| सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
चैतन्य, आनंद आणि उत्साह देणारा मुंबई येथील श्री राजमातंगी महायज्ञ !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !