जळगावमध्ये सिलिंडरचा साठा संपल्याने नागरिकांकडून आंदोलन !

(प्रतिकात्मक चित्र)
मुंबई – आखाती देशांत चालू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. मुंबईतील मालाडमधील मालवणी भागात सिलिंडरचा अत्यंत तुटवडा आहे. त्यामुळे गॅस एजन्सीबाहेर रांग लावल्यावर सिलिंडरची चोरी होऊ नये, यासाठी नागरिकांनी साखळदंडांनी ४-५ सिलिंडर एकत्र बांधून त्यांना कुलूप लावल्याची घटना समोर आली आहे.

नागपूर येथेही सिलिंडर पुरवठा विस्कळीत झाला आहे. एजन्सीबाहेर सिलिंडर उपलब्ध नसल्याचे फलक लावण्यात आले आहेत.
जळगाव येथेे समर्थ गॅस एजन्सीच्या कारभाराच्या विरोधात नागरिकांनी जामनेर-छत्रपती संभाजीनगर महामार्ग दीड घंटा रोखून धरला. एजन्सीकडून भ्रमणभाष आल्याने नागरिक पहाटेपासून रांगेत उभे राहिले; पण सकाळी ११ वाजता साठा संपल्याचे सांगण्यात आल्याने नागरिकांचा संयम सुटला. पोलीस आणि पुरवठा अधिकारी यांनी मध्यस्थी करून सर्वांना गॅस देण्याचे आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.
संपादकीय भूमिकाहेच आहे आपत्काळाचे भीषण वास्तव ! |
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित