
आठवड्यातील कोणताही एक वार ठरवून घ्या. आपल्या प्रिय / इष्ट देवतेचा असला, तरी चालेल. त्या दिवशी प्रत्येक आठवड्याला आपल्या जवळच्या मंदिरात जाण्याची शिस्त लावून घ्या. हे करतांना आधी स्वतःचे कुटुंब आणि नंतर मित्रपरिवार यांना सहभागी करून घ्या. मंदिरात जाऊन देवदर्शन झाले की, काही काळ बसून नामस्मरण किंवा एखादे स्तोत्र आपल्यालाच ऐकू जाईल इतक्या लहान आवाजात म्हणा. जमल्यास तिथे काहीही सेवा करता आली, तर पहा. झाडलोट ही उत्तम सेवा असेल.

हे सगळे का ? तर ‘नेम’ अंगी बाणवण्यासाठी, पुढच्या पिढीवर उत्तम संस्कार करण्यासाठी, येणार्या काळात संघटन हे केवळ संमेलन नाही, तर प्रत्यक्ष कार्यस्तरावर आणि सातत्याने होणे, ही आवश्यकता आहे यासाठी ! याखेरीज यात अन्य कुणाही व्यक्तीचा हस्तक्षेप नसल्याने तुम्ही फसवले जाण्याची वगैरे शक्यताही नाही; पण ही शिस्त महत्त्वाची आहे. हे चालू करा. मी गेल्या किमान ५ वर्षांपासून हे करत आहे, अगदी व्याख्यान किंवा प्रवचन यांसाठीच्या दौर्यावर असलो तरी ! आधी स्वतः करून मगच तुम्हाला सांगत आहे !!
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली. (३१.३.२०२६)
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !
‘स्मार्ट’ फसवणूक !
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी न्यायालयीन संघर्ष
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
प्रेमप्रकरण कि हृदयातील कपट ?