नाशिक – भोंदूबाबा अशोक खरात याच्या पोलीस कोठडीत १ एप्रिलपर्यंत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नाशिक जिल्हा न्यायालयाने दिला आहे. महिलांवरील अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीचे गंभीर गुन्हे नोंदवलेल्या खरातचे अन्वेषण करण्यासाठी विशेष अन्वेषण पथकाला अधिक कालावधीची आवश्यकता असल्याचे न्यायालयाने मान्य केले.
रुपाली चाकणकर यांना नोटीस !
पुणे – भोंदूबाबा अशोक खरात यांच्या वादग्रस्त प्रकरणामुळे ‘शिवनिका ट्रस्ट’चे आजी-माजी सदस्य आणि विश्वस्त यांची चौकशी ‘विशेष अन्वेषण पथका’द्वारे करण्यात येत आहे. त्यातून राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनाही चौकशीची नोटीस देण्यात आली. रूपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला प्रदेशाध्यक्षपद यांचे त्यागपत्र दिलेले आहे.
‘कोणत्याही अन्वेषणामध्ये नाव समोर आल्यानंतर पोलीस त्यांची बाजू पडताळून पहाण्यासाठी नोटीस पाठवतात. त्यानुसार चाकणकर यांना नोटीस दिली असेल. त्यांची साक्ष नोंदवून घेतली जाईल. अन्वेषणातून जे समोर येईल, त्यानुसार पुढील कारवाई केली जात आहे’, असे महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांसमोर सांगितले.
आयोगाकडील तक्रारींचे पुनर्अन्वेषण करावे ! – दमानिया
मुंबई – रूपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा असतांना त्यांच्याकडे आलेल्या अशोक खरात याच्याविषयीच्या तक्रारी दडपल्या गेल्याची शक्यता आहे. त्यामुळे अशोक खरात याच्याविषयी राज्य महिला आयोगाकडे आलेल्या तक्रारींचे पुनर्अन्वेषण करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सरकारकडे केली आहे. अशोक खरात याने महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण उघड झाल्यावर रूपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचे त्यागपत्र दिले आहे.

संपादकीय : नद्यांचे ‘प्रशासकीय’ प्रदूषण !
बलात्कार प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांना निर्देश देणारे झारखंड उच्च न्यायालयाचे निकालपत्र !
आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी भवानी पेठेतील (पुणे) जागा कह्यात घेऊन इमारतीचे पाडकाम अंतिम टप्प्यात !
नांदणी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महादेवी’च्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा !
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !
प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !