सावरकर मानहानीप्रकरणी सात्यकी सावरकर यांची न्यायालयात उलटतपासणी चालू !

पुणे – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या अपकीर्तीकारक वक्तव्याप्रकरणी काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या विरोधात पुणे येथील न्यायालयात खटला चालू आहे. या खटल्यात राहुल गांधींचे अधिवक्ता मिलिंद पवार हे सात्यकी सावरकर यांची उलटतपासणी घेत आहेत.

१. न्यायालयातून हरवलेल्या सीडीच्या संदर्भात त्यांनी कोणतीही तक्रार केली नाही. सीडीसंदर्भात आजपर्यंत कोणतीही सखोल चौकशी झाली नाही.

२. सादर केलेल्या शब्दांकनावर (ट्रान्स्क्रिप्शन) दिनांक नाही. दोन्ही शब्दांकनांचे लिखाण एकसारखे असले, तरी ते मूळ सीडीवर आधारित असल्याचे सिद्ध करता आले नाही.

याव्यतिरिक्त पोलीस अन्वेषणामध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत. पोलिसांनी आवश्यक असलेली प्रमाणपत्रे योग्य प्रकारे संकलित केली नाहीत. यू ट्यूब लिंक, तसेच डिजिटल पुराव्यांची शास्त्रीय पडताळणीही केलेली नाही. राहुल गांधींचे भाषण कोठे ध्वनीमुद्रित केले ? कुणी केले ? त्या कार्यक्रमांमध्ये भारतातील कोण पत्रकार उपस्थित होते का ? श्रोते कोण होते ? या संदर्भात त्यांना कोणतीही प्रत्यक्ष माहिती नाही, असे सात्यकी सावरकर यांनी मान्य केले. या खटल्याची पुढील सुनावणी ३१ मार्च या दिवशी होणार आहे.