अमृतसर येथे अडीच लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त

अमृतसर (पंजाब) – पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस्.आय. (इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स – आंतरसेवा गुप्तचर यंत्रणा) नेहमीच भारतीय सीमेत आर्डीएक्स, ग्रेनेड, पिस्तूल, काडतुसे आणि हेरॉइन यांचा मोठा साठा टाकत असते. आता पाकिस्तानने ड्रोनद्वारे पंजाबमध्ये बनावट नोटा टाकल्याचे उघड झाले आहे. सीमा सुरक्षा दलाने पंजामधील घरिंदा येथे अडीच लाख रुपयांच्या बनावट भारतीय नोटा जप्त केल्या. नोव्हेंबर २०१८ मध्ये भारतात नोटाबंदी लागू झाल्यानंतर पाकिस्तानने भारतीय सीमेत अशा बनावट नोटा टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे.
गुप्तचर संस्थेच्या एका अधिकार्याने सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्थेला हानी पोचवण्यासाठी आय.एस्.आय. पाकिस्तानच्या सीमावर्ती भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर बनावट भारतीय चलन छापण्याची सिद्धता करत आहे. जेणेकरून या बनावट नोटा भारतात खर्या नोटांसमवेत चलनात आणता येतील. सुरक्षा यंत्रणेने यासंदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाला एक अहवालही पाठवला आहे.
संपादकीय भूमिकापाकच्या कुरापती रोखण्यासाठी त्याला नष्ट करणेच आवश्यक ! |
Putin Praises India : भारतीय हे जगातील सर्वांत प्रतिभावान लोकांपैकी एक आहेत ! – व्लादिमिर पुतिन, राष्ट्राध्यक्ष, रशिया
इराणच्या क्षेपणास्त्र क्षमतेची मोठ्या प्रमाणात हानी ! – Donald Trump
अमेरिकेतील ‘ब्लूमबर्ग’ या वृत्तसंस्थेकडून भारतविरोधी लेख मागे !
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतांना पकडलेल्या युवकाची आत्महत्या
‘एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक !’ – अमेरिका
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !