इराणमधील नागरिकांचा उठाव, म्हणजे मूळ संस्कृतीचे पुनरुज्जीवन !

राष्ट्रहितार्थ

सरकारविरुद्ध बंड नव्हे, तर सांस्कृतिक अस्मितेसाठीचा संघर्ष 

‘इराणमधील कट्टर धर्मगुरूंच्या गटाला ठाऊक आहे की, त्यांच्या अस्तित्वाला खरा धोका सौदी अरेबिया किंवा संयुक्त अरब अमिरात यांच्याकडून नव्हे, तर इराणमधीलच जागृत होत असलेल्या लोकांकडून (‘एक्स मुस्लिमां’कडून, म्हणजेच इस्लामचा त्याग केलेल्या लोकांकडून) आहे. सध्या तेथे लोक धर्मनिरपेक्षता आणि प्राचीन पारशी अन् यझदी परंपरांचा पुनर्शोध यांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. परिणामी सध्याच्या तेथील धर्मांध सामाजिक व्यवस्थेसमोर अस्तित्वाचे संकट उभे राहिले आहे. ही धर्मांध सामाजिक व्यवस्था आता अधिकाधिक असहिष्णु आणि आक्रमक बनत असून स्वातंत्र्य अन् समता यांच्या तत्त्वांना तिलांजली देत आहे.

लेखक : श्री. मयंक जैन, लघुपट निर्माते, देहली.

१. ‘एक्स मुस्लीम’ चळवळीपासून जगाचे लक्ष भरकटवण्याचा इराणी राज्यकर्त्यांचा प्रयत्न

इराणमधील जागृत नागरिक, म्हणजेच ‘एक्स मुस्लिमां’चा उठाव लपवण्यासाठी कट्टर धर्मगुरूंचा गट या उठावाला जाणूनबुजून ‘शिया विरुद्ध सुन्नी यांच्यातील सांप्रदायिक युद्ध’ असे संबोधतो. यासह तो अबूधाबी, दुबई, तसेच सौदी अरबमधील तेल प्रकल्पांवर क्षेपणास्त्रे अन् ड्रोन यांद्वारे आक्रमण करून या कथानकाला अधिक धार देतो. ही केवळ सैनिकांकडून करण्यात येणारी आक्रमणे नाहीत. इराणमधील ‘एक्स मुस्लीम’ चळवळीवरून जागाचे लक्ष भरकटवण्यासाठी, तसेच ‘हा संघर्ष सांस्कृतिक जागृतीविषयी नसून प्रादेशिक शत्रुत्वाविषयी आहे’, असे जगाला पटवून देण्यासाठी इराणी राज्यकर्ते आटोकाट प्रयत्न करत आहेत.

मयंक जैन यांचा परिचय

श्री. मयंक जैन

श्री. मयंक जैन एक प्रसिद्ध लघुचित्रपट निर्माते असून हिंदुत्वयोद्धा आहेत. त्यांनी ५० हून अधिक चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. या माध्यमातून त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा, प्राणी संरक्षण, मानवी विकास, आरोग्य आदी अनेक विषयांवर व्यापक काम केले आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतांना जैन यांनी ‘इंडिया टुमॉरो : द गुजरात मिरॅकल’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्यांनी भारताला उद्ध्वस्त करू पहाणार्‍या बांगलादेशी घुसखोरीच्या संदर्भात ‘द बांगला क्रिसेंट’ नावाचा महत्त्वाचा चित्रपट बनवला होता. आता त्याचाच पुढचा भाग (सिक्वेल) म्हणून ‘क्रिमसन क्रिसेंट : द लास्ट क्वॉर्टर’ नावाचा चित्रपट त्यांनी काही महिन्यांपूर्वीच बनवला. या माध्यमातून त्यांनी इस्लामी विचारसरणीच्या व्यापक विषयावर प्रकाश टाकला आहे.

२. इस्लामी प्रजासत्ताकाला ७० ते ८० टक्के इराणी नागरिकांचाच विरोध !

कट्टरपंथी धर्मगुरु म्हणतात की, इराणमधील अशांतता बाहेर देशांतून निर्माण केली गेली आहे; पण अनेक ‘एक्स मुस्लीम’ म्हणतात की, ही अशांतता नसून इराण सरकारने अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि धार्मिक निवड यांवर घातलेल्या मर्यादांमुळे उभी राहिलेली देशव्यापी चळवळ आहे. सर्वेक्षणात सत्य स्पष्ट आहे की, ७० ते ८० टक्के इराणी लोक इस्लामी प्रजासत्ताकाला विरोध करतात, मशिदी रिकाम्या असतात आणि तरुण धर्मनिरपेक्ष ओळख स्वीकारतात. त्यामुळे इराणची बाह्य आक्रमकता ही त्याची शक्ती नसून भीती आहे. क्षेपणास्त्र आणि ड्रोन आक्रमणे हा बाह्यतः दाखवला जाणार प्रचार आहे. खरी क्रांती सामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

३. इराणमधील तर्कवादी पुनर्जागरण

आपण इराणकडे केवळ ‘अमेरिका विरुद्ध इराण’, ‘इस्रायल विरुद्ध हिजबुल्ला’ अशा भू-राजकारणातूनच नव्हे, तर त्याच्या विचारसरणीतूनही पहायला हवे. सध्या तेथे समाज पालटत आहे, लोक तर्काला महत्त्व देत आहेत. हा पालट नागरिकांना उज्ज्वल भविष्याकडे नेणारा एक दुर्मिळ टप्पा आहे.

४. इराणमधील बहुतांश नागरिकांना हवा आहे सत्तापालट !

इराणमध्ये करण्यात आलेली स्वतंत्र सर्वेक्षणे या पालटाची पुष्टी करतात. वर्ष  २०२० मध्ये ‘गमान’ (ग्रुप फॉर ॲनालायझिंग अँड मेजरींग ॲटीट्यूड्स इन इराण) या नेदरलँडमधील संस्थेने ५० सहस्रांहून अधिक इराणी नागरिकांचे सर्वेक्षण केले. त्याता केवळ ३२ टक्के लोक शिया मुस्लीम असल्याचे दिसून आले, तर जवळजवळ अर्धे लोक स्वतःला अधार्मिक किंवा नास्तिक मानतात, असे उघड झाले. वर्ष २०२५ पर्यंत ७७ सहस्र प्रतिसादकर्त्यांच्या आणखी एका सर्वेक्षणात असे आढळून आले की, केवळ २० टक्के लोकांनी ‘इस्लामी रिपब्लिक’चे समर्थन केले, तर ७० ते ८० टक्के लोकांनी धर्मनिरपेक्ष लोकशाही किंवा शासन पालटाचे समर्थन करत धर्मांध राज्यव्यवस्थेला विरोध केला.

इतर सर्वेक्षणांतही हेच दिसून आले आहे. ९२ टक्के इराणी नागरिकांनी देशातील राज्यव्यवस्थेविषयी अप्रसन्न व्यक्त केली. सहस्रो मशिदी रिकाम्या रहात असल्याने विश्वासाचा र्‍हास झाल्याचे प्रशासकीय अधिकारीही मान्य करतात. इराणमध्ये इस्लाम सोडून जाण्यावर कठोर दंड आकारला जातो, तरीही सहस्रो लोक अजूनही तो सोडत आहेत.

५. विवेक आणि तर्क यांच्या आधारे स्वातंत्र्यासाठी लढण्याविषयी इराणच्या इतिहासातील घटना !

इराणमध्ये प्रस्थापित राजवटीविरुद्ध आंदोलन करणार्‍या लोकांना मारहाण, अटक आणि कधी कधी फाशीची शिक्षा दिली जाते. त्यांच्यावर अल्लाहविरुद्ध शत्रुत्व पसरवल्याचा आरोपही करण्यात येतो. इतिहास आपल्याला याच परंपरेची आठवण करून देतो. अलेक्झांडर सोल्झेनित्सिनने याने ‘गुलाग द्वीपसमूह’ या पुस्तकातून सोव्हिएत संघातील कामगारांच्या छावण्यांची सत्यस्थिती जगासमोर आणत हुकूमशाहीचे पितळ उघड पाडले. यासह गॅलिलीओ याने वर्ष १६३३ मध्ये सूर्यकेंद्री ( हेलिओसेन्ट्रझिम) सिद्धांताचे समर्थन केल्याने त्यास रोमन चौकशी समितीसमोर उभे रहावे लागले आणि नंतर आयुष्यभर घरात स्थानबद्ध रहावे लागले. जिओर्डानो ब्रुनो याने ‘विश्व अनंत आहे आणि त्यात असंख्य जग आहेत’, असे सांगितले. त्यास सांगूनही त्याने त्याचा हा विचार विचार मागे घेण्यास नकार दिल्यामुळे त्यास वर्ष १६०० मध्ये रोममध्ये जिवंत जाळण्यात आले. सॉक्रेटिस याने देवाचा अपमान केल्याचा आणि तरुणांना चुकीचे शिकवल्याचा आरोप झाला. इ.स. ३९९ पूर्वी त्याने स्वतःचे तत्त्वज्ञान सोडण्यापेक्षा विष पिऊन मृत्यू स्वीकारला.

इराणमधील निदर्शक केवळ भूक भागवण्यासाठी नाही, तर विचार करण्याचे, सत्तेला प्रश्न विचारण्याचे आणि विवेकानुसार जगण्याचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढत आहेत.

६. सरकारविरुद्धचा बंड नव्हे, तर सांस्कृतिक अस्मितेसाठीचा संघर्ष  !

तेहरानमधील लब्बाफी-नेजाद रुग्णालयात जानेवारी २०२६ मध्ये एका तरुण डॉक्टराने एका आंदोलकाचा डोळा वाचवण्याची विनंती केली. सुरक्षादलांनी तो काढण्याचा आदेश दिला. रुग्ण असलेल्या २२ वर्षीय विद्यार्थ्याने स्वातंत्र्याच्या घोषणा दिल्याने त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यामुळे तो घायाळ होऊन वेदनेने ओरडत होता. नंतर त्याला परत मिळवण्यासाठी त्याच्या कुटुंबाला त्याचे ‘बसिज निष्ठावंत’ म्हणून खोटे मृत्यू प्रमाणपत्र देण्यास भाग पाडले गेले. ३१ डिसेंबर २०२५ या दिवशी, म्हणजे नववर्षाच्या पूर्वसंध्येला हेस्साम खोदयारिफार्ड हा वयोवृद्ध एका महिलेला वाचवतांना गोळी लागून मरण पावला. त्याच्याकडून प्रेरणा घेऊन असंख्य जण या लढ्यासाठी पुढे आले. दुसरीकडे सरकारने मात्र त्याच्या मृत्यू प्रमाणपत्रात चुकीची माहिती दाखवण्यास त्याच्या कुटुंबाला भाग पाडले.

प्रत्येक कथा ही एक ठिणगी आहे. एकटी असली तरी फक्त वेदना दाखवते; पण एकत्र आल्यास ती ज्वाळा बनते आणि ती आग कुणीही विझवू शकत नाही. हे केवळ सरकारविरुद्धचे बंड नाही, तर सांस्कृतिक अस्मितेसाठीचा संघर्ष आहे. या संघर्षात अनेक दशकांच्या लादलेल्या श्रद्धा, सत्ता आणि ऐतिहासिक स्मृती यांचे पुनर्मूल्यांकन करणार्‍या समाजाचे प्रतिबिंब आहे. झोराष्ट्रीयन नीतीमूल्ये, यझदी परंपरा आणि इस्लामपूर्व पर्शियन इतिहास पुन्हा शोधणे, म्हणजे केवळ भूतकाळाची आठवण काढणे नाही. ही आपल्या संस्कृतीची पुन्हा जागृत होणारी स्मृती आहे, जणू बराच काळ दडपून ठेवलेल्या लोकभावना जागृत होत आहेत. पू. रामस्वरूप गर्ग यांनी सांगितल्याप्रमाणे ‘मतांधतेमुळे थांबवलेल्या परंपरा पूर्णपणे नष्ट होत नाहीत; त्या केवळ शांतपणे दडून रहातात आणि पुन्हा उभ्या रहाण्याची वाट पहातात.’ योगी श्री अरबिंदो यांनी म्हटल्याप्रमाणे ‘इतिहासात काही वेळा असे क्षण येतात की, समाज बंधनातून मुक्त होऊन एका उच्च ध्येयाकडे वळतो.’ इराण आता कदाचित् अशाच एका युगात प्रवेश करत असावा, जे युग विवेकवादाकडे वाटचाल करणारे असेल आणि मानवतेविषयीचा व्यापक आदराने ओतप्रोत असेल.

७. समाजरक्षणाच्या नावाखाली समाजालाच गिळंकृत करणारी आतंकवादी विचारसरणी !

भारतीय इतिहासकार पू. सीताराम गोयल यांनी अशी चेतावणी दिली की, आतंकवादी विचारसरणी अंततः मुक्त भावना आणि विचार यांना जागा न देता ते ज्या समाजाचे रक्षण करण्याचा दावा करतात, त्याच समाजाला गिळंकृत करतात. इराण हे त्याचे उदाहरण आहे. तेथील अन्यायी राजवटीने लोकांचा आवाज दाबून आणि त्यांचे स्वातंत्र्य नाकारून हेच सिद्ध केले आहे. याचा परिणाम, म्हणजे एक अशी पिढी निर्माण झाली आहे, जी त्यांच्या मूळ तत्त्वांपासून आणि शासकांनी लादलेल्या श्रद्धेपासून दुरावली गेली आहे. विशेष म्हणजे हे पतन धर्मगुरूंनाही मान्य करणे भाग पडले. वरिष्ठ धर्मगुरु महंमद अबोलघासेम दौलाबी यांनी नमूद केले की, इराणच्या ७५ सहस्र मशिदींपैकी अनुमाने ५० सहस्र मशिदी उपासकांच्या अभावामुळे बंद झाल्या आहेत. त्यामुळे सक्तीच्या श्रद्धेची इमारत आतून कोसळत असल्याचे सिद्ध होते.

पू. रामस्वरूप गर्ग यांनी आधी सांगितल्याप्रमाणे ‘दडपलेल्या परंपरा जागृत होतात. स्वातंत्र्य, मुक्त विचार आणि आध्यात्मिक शोध या मानवी आत्म्याचा कायमचा नाश करणे शक्य नाही.’ योगी श्री अरबिंदो यांनी लिहिल्यानुसार ‘जेव्हा इतिहास स्वतः झुकतो तेव्हा राष्ट्रांमध्ये पालट होतो.’ ज्यांनी गुदमरणे सहन केले, ते आता नूतनीकरणाचे शिल्पकार बनू शकतात. एकेकाळी दैवी पालकत्व म्हणून ज्याची घोषणा केली जात होती, ती भीती म्हणून प्रकट होते आणि एकेकाळी रूढीवादी म्हणून ज्याची कार्यवाही केली जात होती, ती संस्कृतीच्या स्मृतीच्या सखोल प्रवाहांमध्ये अडकत आहे.

८. ध्येयापासून जराही विचलित न होणारे सर्वसामान्य नागरिक !

‘इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉप्स’ स्वतःला क्रांतीचा संरक्षक म्हणवतो. खरेतर हा शब्द लाजिरवाणा आहे. पाशवी शक्तीने अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा गळा दाबण्यात, कारागृह किंवा बंदूक यांचे भय दाखवून स्वतःविरुद्ध असहमती दर्शवणार्‍यांचा आवाज दाबण्यात क्रांतीकारी काय आहे ? क्रांती ही सैन्याच्या तुकड्या किंवा आदेश यांद्वारे नव्हे, तर विवेकाने परिभाषित केली जाते. निःशस्त्र नागरिक हेच खरे क्रांतीकारक आहेत. महिला रस्त्यावर उतरल्या आहेत, विद्यार्थीही रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करत आहेत, आधुनिक वैद्य (डॉक्टर) मृत्यूची खोटी प्रमाणपत्रे देण्यास नकार देत आहेत, दुकानदार एकजुटीने संप पुकारत आहेत. हे सामान्य नागरिक कोणत्याही सशस्त्र आणि अन्यायी राजवटीपेक्षा सरस ठरतात. त्यांना छळाला सामोरे जावे लागते, तरीही ते त्यांच्या ध्येयापासून जराही विचलित होत नाहीत.

इस्लाम त्यागणारे लक्षणीय !


इराणच्या बंडखोरीवर आंतरराष्ट्रीय ‘एक्स मुस्लिम’ चळवळीचे बारीक लक्ष आहे. ‘कौन्सिल ऑफ एक्स मुस्लिम्स ऑफ ब्रिटन’च्या अहवालानुसार संपूर्ण युरोपात ‘एक्स मुस्लिम’ चळवळीचे सहस्रो सदस्य आहेत. एका अहवालानुसार फ्रान्समध्ये १५ सहस्रांहून अधिक ‘एक्स मुस्लिम’ आहेत. अमेरिकेत ‘प्यू रिसर्च’ या संस्थेच्या अहवालानुसार दरवर्षी अनुमाने १ लाख मुसलमान इस्लामचा त्याग करतात. भारतातही हा आकडा लाखोंमध्ये आहे. जर इराणने त्याची खरी सांस्कृतिक ओळख पुन्हा स्वीकारली, तर त्याचा परिणाम फार वेगाने आणि दूरपर्यंत होऊ शकतो. यामुळे युरोप, उत्तर अमेरिका आणि आफ्रिका येथेही लोक राजवटीला प्रश्न विचारू लागतील. इंडोनेशिया आणि मलेशियामध्ये येथे तर भूमीगत तर्कवादी त्यांचे जाळे शांतपणे विस्तारत आहे.

९. तेल वर्चस्व आणि पाश्चिमात्यांची कोंडी !

अमेरिकेने इराणकडे नेहमीच तेल, सत्ता आणि डॉलर या दृष्टीने पाहिले आहे; पण प्रत्यक्षात तेथे एक सांस्कृतिक पुनरुत्थान चालू आहे. पाश्चिमात्य देशांनी भूतकाळात मूळ रहिवाशांचे अधिकार हिरावणे, आदिवासींचे दमन, कृष्णवर्णीय समुदायांना गुलामगिरीत ठेवणे, असे अनेक अन्याय केले आहेत. हे अन्याय आता हे देश मानवाधिकार, लोकशाही व्यवस्था आदींद्वारे मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत; परंतु पाश्चिमात्य जगातील ‘वोक’ (साम्यवादी) घटक आता या जखमा अवास्तव मार्गांनी उकरून काढत आहेत; त्या भरून काढण्यापेक्षा ते अराजकता आणि गोंधळ निर्माण करत आहेत. जर संस्कृतीचे पुनरुज्जीवन सार्वत्रिकपणे स्वीकारले गेले, तर इराणने केवळ त्याच्या तत्त्वज्ञानाचा सामना करावा असे नाही, तर पाश्चिमात्य देशांनी सध्याच्या अव्यवस्थेसाठी शस्त्रास्त्र न वापरता त्यांच्या भूतकाळातील अन्याय स्वीकारावा, अशीही मागणी केली जाईल.

‘एक्स मुस्लीम’ चळवळ चिरडण्यासाठी सरकारकडून पाशवी बळाचा वापर !

आपल्या आयुष्यात आपण ३ घटना पाहिल्या आहेत –

१. सोव्हिएत युनियनचे पतन, जेथे विचारसरणी स्वतःच्याच अंतर्विरोधांमुळे कोसळली.

२. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांची आधुनिकीकरणाची धोरणे, जेथे सत्ताधिशांच्या आदेशाने निर्बंध शिथिल केले गेले.

३. आता इराण, जेथे पालट सत्ताकेंद्राकडून नव्हे, तर रस्त्यांवरून उदयास येतो.


हा भेद महत्त्वाचा आहे. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती येथील निर्बंध तेथील सत्ताधिशांनी शिथिल केले, तर इराणमधील जनतेची क्रांती पालट घडवत आहे. ती हुकूमशाहीने नव्हे, तर सद्सद्विवेकबुद्धीने घडली आहे. वर्ष २०२५ च्या अंती इराणचे तरुण कट्टर विचारसरणीला आव्हान देण्यासाठी रस्त्यावर उतरले. त्यांनी महिलांना सक्तीने घालायला लावण्यात येणारे ‘स्कार्फ’ आणि ‘बुरखा’ नाकारला, संगीत अन् नृत्य यांवरील बंदी झुगारली आणि साचेबद्ध विचारसरणीला उघडपणे विरोध केला. यांपैकी बरेच जण ‘एक्स मुस्लीम’ होते आणि त्यांच्या या उठावाविषयी इस्लामी धर्मगुरूंमध्ये संताप उसळला. क्रांती बनलेल्या हा उठाव चिरडून टाकण्याचा निर्धार करून इराणी सत्ताधिशांनी पाशवी बळाचा वापर केला. जानेवारी २०२६ पर्यंत या कारवाईत ६०० हून अधिक निदर्शक मारले गेले आणि २० सहस्रांहून अधिक घायाळ झाले. सुरक्षादलांनी दारूगोळा, धातूच्या गोळ्यांनी भरलेल्या बंदुका, अश्रूधुराच्या नळकांड्या यांद्वारे शांततापूर्ण निदर्शने करणार्‍या निदर्शकांना मारहाण केली. इराणी इस्लामवादी विरुद्ध ‘एक्स मुस्लीम’ हाच या संघर्षाचा गाभा आहे. अन्य इस्लामी देशांनी हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. इराणमधील नागरिकांचा उठाव हा केवळ निषेध नाही, तर संस्कृतिक पुनर्रचनेचा एक भाग आहे.

– श्री. मयंक जैन

१०. …तेव्हाच इतिहासाचे वर्तुळ पूर्ण होईल !

एक सहस्र वर्षांहून अधिक काळापूर्वी पर्शियाच्या आरंभीच्या इस्लामी शासकांने केलेल्या छळामुळे पारशी लोकांनी त्यांचा पवित्र अग्नी इराणहून भारतात नेला. भारतात निर्वासित स्थितीत असलेले पारशी भारतातील सर्वांत लहान; पण सर्वांत प्रभावशाली समुदायांपैकी एक बनले.

त्यांनी पोलाद कारखाने, विमान कंपन्या, रुग्णालये, शाळा आणि वैज्ञानिक संस्था उभारल्या. टाटा, गोदरेज, वाडिया, पेटिट, शापूरजी पल्लोनजी, रेडीमनी आणि जिजीभॉय यांसारख्या घराण्यांनी मुंबई अन् गुजरातमध्ये सद्सद्विवेकबुद्धीची ज्योत तेवत ठेवली. जेव्हा मुंबई किंवा नवसारी येथील पारशी समाज त्यांच्या पूर्वजांचा सन्मान करण्यासाठी पुन्हा एकदा यझद आणि शिराझ येथे एक ना एक दिवस जातील, अशी अपेक्षा आहे. तेव्हा इतिहासाचे वर्तुळ पूर्ण होईल. पर्शियातून भारतात आणलेला तो अग्नी  त्यांच्या संस्कृतीला प्रकाशित करण्यासाठी पुन्हा पर्शियात जाईल.

११. संस्कृतीचे पुनरुज्जीवन !

इराणमधील उठाव, म्हणजे संस्कृतीचे पुनरुज्जीवन आहे. तर्कशुद्ध भावना आणि वैज्ञानिक स्वभाव असलेल्या शक्ती आता पर्शियन जगात पुन्हा उसळी मारतील. जेव्हा एखाद्या संस्कृतीचे पुनरुज्जीवन होते, तेव्हा कट्टर विचासरणीही थरथरायला लागते. ‘इराणमधील सर्वांत मोठ्या परिवर्तनाचे नेतृत्व सेनापती किंवा मौलवी यांनी नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांनी केले’, याची इतिहासात नोंद होईल !’

लेखक : श्री. मयंक जैन, लघुपट निर्माते, देहली. (६.३.२०२६)

(साभार : ‘हिंदु पोस्ट’चे संकेतस्थळ)