
पणजी, २७ मार्च (वार्ता.) – ९० लाख ८५ सहस्र रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याच्या प्रकरणी गोवा सायबर गुन्हे विभाग पोलिसांनी केरळ येथील महंमद रसिक पुलिक्कल (वय २१ वर्षे) याला अटक केली आहे. संशयिताचा गोवा आणि कर्नाटक या राज्यांत मिळून एकूण २ कोटी १० लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणांमध्ये सहभाग असल्याचे उघड झाले आहे.
यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार पणजी येथील एका नागरिकाने केलेल्या तक्रारीनुसार आरोपीने या नागरिकाला संपर्क करून स्वतः टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडिया आणि मुंबई येथील केंद्रीय अन्वेषण विभाग यांचा अधिकारी असल्याचे सांगितले. वैयक्तिक माहितीचा गैरवापर केल्याचा खोटा आरोप करून सदर नागरिकाचा संबंध एका उद्योगपतीशी संबंधित पैशांच्या गैरव्यवहार प्रकरणाशी असल्याची बतावणी आरोपीने केली आणि त्याला अटक करणार असल्याचा दबाव आणून हे प्रकरण मिटवण्यासाठी मोठी रक्कम भरण्यास भाग पाडले. (यामध्ये प्रकरण मिटवण्यासाठी पैसे देणार्याचीही चूक आहे. तक्रारदाराने जर कोणताच पैशांचा गैरव्यवहार केला नसेल, तर त्याला प्रत्यक्ष अन्वेषण अधिकार्यांनी जरी चौकशी केली असती, तरी घाबरण्याची आवश्यकता नव्हती ! – संपादक) आरोपीने तक्रारदाराकडून ९० लाख ८५ सहस्र रुपये उकळले. यासंबंधी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी संशयिताचा त्वरित शोध घेऊन केरळमधील मलप्पूरम् येथे कारवाई करून संशयिताला अटक केली. संशयिताच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले होते. ही रक्कम नंतर इतर सहकार्यांच्या खात्यामध्ये वळवण्यात आल्याचे उघड झाले.
पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी संशयितावर भारतीय न्याय दंड संहितेच्या कलम ३१८(४), ३१९(२), तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६६ डी अतंर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या धमक्या किंवा संशयास्पद दूरध्वनी यांपासून सावध रहावे आणि आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी निश्चिती करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (०७.०६.२०२६)
गोव्यातील मंदिरांवरील ब्राह्मणीकरणाचे आरोप हास्यास्पद !
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्तांकडून पहाणी
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करा !
कोल्हापूर आगारात ‘ई-शिवाई’ इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण उत्साहात !