मौलानासह (इस्लामच्या धार्मिक नेत्यासह) १२ जणांवर गुन्हा नोंद !

अहिल्यानगर – श्रीरामपूर शहरात गोंधवणी परिसरातून श्रीराममंदिराच्या दिशेने निघालेल्या भव्य शोभा यात्रेवर अचानक दगडफेक करण्यात आली. सय्यद बाबा चौकातील दर्गा (मुसलमानांच्या कथित सिद्धपुरुषांच्या समाधीस्थळाच्या) परिसरात ही घटना घडली. यामध्ये २ जण घायाळ झाले असून एकाला गंभीर दुखापत झाली. संबंधिताचा एक डोळा कायमचा निकामी झाला आहे. पोलिसांनी तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. सध्या श्रीरामपूरमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी सुयोग झिरांगे यांनी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी मशिदीमधील मौलाना आणि इतर १० ते १२ अज्ञात व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे दगडफेक करणार्यांचा शोध घेतला जात आहे. घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. आरोपींना तात्काळ अटक करत कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी तसेच घटनेचा निषेध करण्यासाठी २७ मार्च या दिवशी सकल हिंदु समाज एकवटला होता.

संपादकीय भूमिकाश्रीरामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक होण्यासाठी हा पाकिस्तान आहे का ? हिंदूबहुल देशात हिंदूंना स्वत:च्या आराध्यदैवताची मिरवणूक काढण्यासाठी जीव मुठीत धरून किंवा कडेकोट पोलीस बंदोबस्तात फिरावे लागणे, हे लज्जास्पद आहे. धर्मांधांच्या या देशविघातक कृत्यांचा वेळीच बीमोड करणे आवश्यक आहे ! |
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
एस्.टी.च्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त परिवहनमंत्र्यांकडून राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ !
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक
४ वर्षांपासून पसार असलेल्या २ मुख्य आरोपींना अटक !
भोजशाळेच्या प्रकरणी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार
कंत्राटदाराला ५ लाख रुपये, तर सल्लागार संस्थेला २ लाख रुपयांचा दंड !