(लॉकडाऊन म्हणजे दळणवळण बंदी)

नवी देहली – मध्यपूर्वेतील युद्धामुळे देशात एल्.पी.जी. गॅसची टंचाई आणि पेट्रोल-डिझेल महाग होण्याची चर्चा असतांना भारतात लॉकडाऊन होणार असल्याची चर्चा आहे. यामुळेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही शहरांमध्ये पेट्रोल पंपांच्या बाहेर लोकांनी लांबच लांब रांगा लावल्या. यावर आता केंद्र सरकारकडून उत्तर देण्यात आले आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत सांगितले की, भारतात लॉकडाऊन होणार असल्याच्या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत. भारत सरकारकडून असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. त्यामुळे अशा प्रकारे अफवा पसरवून भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, हे दायित्वशून्य आणि हानीकारक कृत्य आहे. सध्या जागतिक परिस्थिती अनिश्चित असली, तरी आम्ही ऊर्जा, पुरवठा साखळी आणि महत्त्वाच्या उत्पादनांशी निगडित परिस्थिती यांवर लक्ष ठेवून आहोत. सरकार देशात इंधन, ऊर्जा आणि इतर आवश्यक गोष्टी यांचा योग्य पुरवठा होईल, याची दक्षता घेत आहे. कोणत्याही अडथळ्यांविना ऊर्जा पुरवठा चालू आहे. कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी आपण सिद्ध आहोत.
The global situation remains in flux, and we are closely monitoring developments across energy, supply chains, and essential commodities on a real-time basis.
Under the leadership of Hon’ble PM @narendramodi Ji, all necessary steps are being taken to ensure uninterrupted…
— Hardeep Singh Puri (@HardeepSPuri) March 27, 2026
पेट्रोल आणि डिझेल यांच्यावरील उत्पादनशुल्क अल्प !
केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादनशुल्क १३ रुपयांवरून ३ रुपये, तर डिझेलवरील उत्पादनशुल्क १० रुपयांवरून शून्य करण्यात आले आहे. याविषयी केंद्रीय संसदीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले की, आपल्या देशात तेल आणि वायू यांचे उत्पादन किती अल्प आहे ?, हे सामान्य माणूसही जाणतो. आपण इतर देशांवर अवलंबून आहोत. दैनंदिन जीवनात सर्वांना वायू आणि पेट्रोल लागते. कोणत्याही परिस्थितीत दर वाढू नयेत, तसेच किंमती नियंत्रणात रहाव्यात, यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शुल्क इतके अल्प करण्यात आले आहे की, त्याची कल्पनाही करता येणार नाही.
🚨 Lockdown Rumours? Don’t Panic! 🇮🇳
Amid Middle East tensions & fuel concerns, panic buying led to long queues at petrol pumps.
🛑 Govt Clarifies:
Union Minister Hardeep Singh Puri confirms – NO lockdown is being planned.FM Nirmala Sitharaman also dismisses such claims.
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 27, 2026
राज्यांच्या व्यावसायिक वापराच्या एल्.पी.जी. पुरवठ्यात २० टक्के वाढ !
केंद्र सरकारने व्यावसायिक वापराच्या एल्.पी.जी.च्या वाटपात पालट केला आहे. राज्यांच्या एल्.पी.जी. पुरवठ्यात वाढ करण्यात आली आहे. २० टक्के एल्.पी.जी. अधिक दिला जाणार असला, तरी हा २० टक्के गॅस पूर्णपणे औद्योगिक वापरासाठी दिला जाणार आहे. स्टील, ऑटोमोबाईल, टेक्स्टाईल आणि उद्योग यांना हा गॅस दिला जाणार आहे.
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
संपादकीय : सरकारची ऑनलाईन फसवणूक !
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये अवैध मद्यविक्री करणार्यांवर २३ गुन्हे नोंद !
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या प्रशासकपदी जिल्हाधिकार्यांची नियुक्ती !