|

बेंगळुरू – शहरातील ‘सिद्धार्थ मेडिकल कॉलेज’मध्ये प्राध्यापक अब्दुल याने एम्.बी.बी.एस्.च्या तिसर्या वर्षात शिकणार्या विद्यार्थिनीला भर वर्गात लग्नाची मागणी घातली. या कृत्यामुळे संतापलेली संबंधित विद्यार्थिनी आणि तिचे वर्गमित्र यांनी संबंधित प्राध्यापकाला महाविद्यालयाच्या आवारातच चपलांनी बेदम मारहाण केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला असून शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. (असे नीतीमत्ताशून्य शिक्षक विद्यार्थ्यांना नीतीमत्तेचे धडे काय देणार ? अशा शिक्षकांमुळेच शिक्षणक्षेत्राची अधोगती झाली आहे, असे म्हटल्यास अयोग्य ठरणार नाही ! – संपादक)
Bengaluru: Abdul, a professor of a medical college, proposed marriage to a female student in the middle of class – thrashed by students
If such individuals are allowed to teach, how can the safety and dignity of female students be assured in educational institutions?
Video… pic.twitter.com/kDrjSIVUWz
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 27, 2026
१. याविषयी मिळालेल्या माहितीनुसार ही घटना महाविद्यालयात नियमित वर्ग चालू असतांना घडली. आरोपी प्राध्यापक वर्गात शिकवत असतांना त्याने अचानक विषयांतर केले आणि एका विद्यार्थिनीसमोर त्याच्या भावना व्यक्त करण्यास चालू केले. प्राध्यापकाने संपूर्ण वर्गासमोर उघडपणे सांगितले, ‘मला तुमच्या वर्गातील सर्वांत महत्त्वाच्या मुलींपैकी एकीला लग्नाची मागणी घालायची आहे.’ यावरून प्राध्यापक आणि ती विद्यार्थिनी यांच्यामध्ये वाद चालू झाला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
२. प्राध्यापकाच्या या वर्तणुकीमुळे वर्गातील वातावरण अत्यंत तणावपूर्ण बनले. प्राध्यापक वर्गाबाहेर पडल्यानंतर संतप्त विद्यार्थिनी आणि तिचे वर्गमित्र यांनी त्यांना महाविद्यालयाच्या आवारातच घेराव घातला. त्यांनी प्राध्यापकाला चपलांनी मारहाण केली.
३. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने महाविद्यालयात धाव घेतली. पोलिसांनी प्राथमिक चौकशी चालू केली असून आरोपी प्राध्यापक आणि पीडित विद्यार्थिनी यांच्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
४. महाविद्यालय प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर नोंद घेतली असून प्राध्यापकावर शिस्तभंगविषयक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
५. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा आणि शैक्षणिक संस्थांमधील नैतिकतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
संपादकीय भूमिकाअसे प्राध्यापक जेथे शिकवत असतील, तेथे विद्यार्थिनीं सुरक्षित वातावरणात शिकतील, याची हमी कोण देणार ? |
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani