Ramlala Surya Tilak : श्रीरामलल्लाच्या माथ्यावर ९ मिनिटे सूर्यकिरणांचा तेजस्वी स्पर्श !

  • श्रीरामलल्लाचा सूर्यतिलक  सोहळा !

  • अयोध्येत १० लाख भाविकांची उपस्थिती

अयोध्या (उत्तरप्रदेश) – अयोध्येत २७ मार्चला अभिजित मुहूर्तावर दुपारी १२ वाजता अयोध्येतील श्रीरामलल्लाचा ‘सूर्यतिलक सोहळा’ पार पडला. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर श्रीरामलल्लाचा हा दुसरा सूर्यतिलक सोहळा आहे.

श्रीरामलल्लाच्या  कपाळावर ९ मिनिटे सुर्यकिरणांचा तेजस्वी स्पर्श झाला. या सोहळ्याला जवळपास १० लाख भाविक उपस्थित होते.

(सौजन्य : Doordarshan National) 

सूर्यतिलक सोहळ्यासाठी २० अष्टधातूच्या नळ्यांपासून ६५ फूट लांबीची एक विशिष्ट रचना सिद्ध करण्यात आली होती. गर्भगृहातील ४ भिंगे आणि ४ आरसे यांमधून श्रीरामलल्लाच्या कपाळावर सूर्यकिरणे पोचतील, अशी व्यवस्था करण्यात आली. सूर्यतिलक सोहळ्याने श्रीरामलल्लाचा जन्मोत्सव साजरा झाला. या वेळी गर्भगृहात उपस्थित १४ पुजार्‍यांनी विशेष प्रार्थना केली. त्यानंतर श्रीरामलल्लाची विशेष आरती करण्यात आली.

दर्शनवेळेत वाढ

श्रीरामनवमीनिमित्त मंदिर फुलांनी सजवण्यात आले होते. या श्रीरामनवमीपासून भक्तांना श्रीरामलल्लाचे दर्शन पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत घेता येणार आहे. यापूर्वी दर्शन सकाळी ६.३० ते रात्री ९.३० वाजेपर्यंत उपलब्ध होते.