सातारा येथे ‘चतुर्थ महाराष्ट्र मंदिर-न्यास राज्य परिषदे’त १ सहस्र १०० हून अधिक मंदिर विश्वस्त आणि प्रतिनिधी यांचा निर्धार
- मुक्त करा मंदिरे आमची, हाच आमचा नारा । सरकारीकरणाला विरोध, घुमतोय आसमंतात सारा ।।
- न्यासाची ही परिषद, अन्यायाला वाचा फोडणार । मंदिरांचे स्वातंत्र्य आम्ही मिळवूनच रहाणार ।।

सातारा – महाराष्ट्र मंदिर महासंघ, मुंबई येथील श्री जीवदानीदेवी संस्था, श्री ज्योतिर्लिंग भीमाशंकर देवस्थान आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने २२ मार्च या दिवशी येथील स्वराज मंगल कार्यालय येथे चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’ आयोजित करण्यात आली होती. परिषदेत राज्यभरातून आलेल्या १ सहस्र १०० हून अधिक मंदिर विश्वस्त आणि प्रतिनिधी यांनी मंदिरांसाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रत्येक मंदिर हे धर्मशिक्षणाचे केंद्र बनवू, मंदिरांच्या आदर्श व्यवस्थापनाद्वारे स्वयंपूर्ण होऊ आणि प्रत्येक मंदिर हिंदूंमध्ये चेतना निर्माण करून राष्ट्रहिताचे कार्य करील, असा निर्धार या प्रसंगी व्यक्त करण्यात आला. ‘हिंदूंच्या प्रथा-परंपरा कुणी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला, तर सरकार कठोर कारवाई करील, तसेच मंदिरांच्या समस्यांसाठी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन तोडगा काढू’, असे आश्वासन फलोत्पादन आणि रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी दिले.
परिषदेत जे निमंत्रित मंदिराचे विश्वस्त, प्रतिनिधी, पुरोहित, मंदिरांच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ते, अभ्यासक आदी सहभागी झाले होते. त्यांच्यासाठी दिवसभर उद्बोधन सत्रे, चर्चासत्रे, कायदेविषयक मार्गदर्शन झाले. विविध ठरावांनी मंदिर परिषदेची सांगता झाली !
वक्फ बोर्डाच्या कह्यात गेलेली मंदिरांची एक एक इंच भूमी परत मिळेपर्यंत राष्ट्रव्यापी आंदोलन करू ! – सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ
२७ मे २०२३ पासून विविध मंदिरांमध्ये ‘वस्त्रसंहिता अभियान’ (मंदिरात प्रवेश करतांना परिधान करावयाच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावलीची मोहीम) चालू केले. हे अभियान आता १० राज्यांमध्ये पोचले असून अमेरिका, ऑस्ट्रेलिया येथील मंदिरांतही ते चालू झाले आहे. त्याचप्रकारे राज्यातील कोणत्याही मंदिरावर आघात झाला, तर प्रत्येक जिल्ह्यातील मंदिर विश्वस्त, प्रतिनिधी यांनी कृतीशील निषेध नोंदवला पाहिजे. यापुढील काळात ‘मंदिर तेथे ग्रंथालय’ हा उपक्रम आपल्याला चालू करायचा आहे. वक्फ बोर्डाच्या कह्यात गेलेली मंदिरांची एक एक इंच भूमी परत मिळेपर्यंत राष्ट्रव्यापी आंदोलन करण्याचा निर्धार या निमित्ताने आपण करत आहोत.
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !