कळंबोली (पनवेल) येथील घटना

पनवेल – येथील कळंबोली परिसरात स्थानिक पत्रकार शैलेश चव्हाण यांना बांधकाम व्यावसायिक वाजिद शेख याने जिवे मारण्याची धमकी दिली. शिवीगाळ करत धक्काबुक्कीही केली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे; मात्र ‘दखलपात्र गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करावी’, अशी मागणी पत्रकार संघटनांनी केली आहे. (हे पत्रकार संघटनांना का सांगावे लागते ? पोलीस स्वतःहून कारवाई का करत नाहीत ? – संपादक)
वाजिद शेख याने चव्हाण यांच्या चारचाकीची छायाचित्रे काढली. याविषयी विचारल्यावर वाजिदने त्यांना ‘गाडीखाली चिरडून टाकीन’, अशी धमकी दिली. (कायदा-सुव्यवस्थेचा धाक राहिला नसल्यानेच मुसलमानांचा उद्दामपणा वाढत चालला आहे, याचे हे उदाहरण होय ! – संपादक)
रायगड प्रेस क्लब, पनवेल प्रेस क्लब आणि पत्रकार हल्ला कृती समिती यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. (केवळ निषेध नोंदवून न थांबता आरोपीवर कठोर कारवाई होईपर्यंत पोलिसांकडे या प्रकरणाचा पाठपुरावा घ्या ! – संपादक)
संपादकीय भूमिकापत्रकाराला धमकी देणे म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील आक्रमणच होय ! |
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
हिंदूंना शत्रूबोध नाही !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)