नागरिकांची मागणी

सातारा, २५ मार्च (वार्ता.) – येथील गोडोली तलाव परिसरामध्ये स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्रीमंत संभाजीराजे भोसले यांचे स्मारक साकारण्यात येत आहे. स्मारकाचे काम पूर्णत्वाच्या वाटेवर आहे; मात्र स्मारक परिसरामध्ये असलेल्या एका हॉटेल व्यावसायिकाकडून मद्यविक्री दुकानाची अनुमती मिळण्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. याविषयी राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक कार्यालयाशी पत्रव्यवहार झाला असून जिल्हाधिकार्यांकडे मान्यतेसाठी हा अर्ज येणार आहे. त्यांनीही या अर्जास मान्यता देऊ नये, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. (नागरिकांना मागणी का करावी लागते ? प्रशासनालाच ते लक्षात आले पाहिजे. – संपादक)
या निवेदनामध्ये म्हटले आहे की, गोडोली येथील मद्यविक्री दुकानाच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे आम्ही तक्रारी केल्या आहेत. याविषयी कार्यालयाने आमचे जबाब नोंदवून घेतले आहेत. हा अर्ज मान्यतेसाठी जिल्हाधिकार्यांकडे येणार असून आमच्या तक्रारी, स्थानिक नागरिक यांचा, तसेच ज्या इमारतीमध्ये मद्यविक्रीचे दुकान थाटण्यात येणार आहे, तेथील माता-भगिनी, आबालवृद्ध आणि इमारतीतील सभासदांच्या हिताचा विचार व्हावा. जिल्हाधिकार्यांनी या मद्यविक्री दुकानास मान्यता दिल्यास आम्हालाही लोकहितार्थ न्यायालयीन लढाई लढावी लागेल.
संपादकीय भूमिकागावोगावच्या नागरिकांना मद्यविक्री बंदीसाठी लढा द्यावा लागणे, हे प्रशासनासाठी लज्जास्पद ! |
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद
मोरजी (गोवा) येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या वेळी अधिवक्ता आणि तक्रारदार यांच्यावर जीवघेणे आक्रमण
अग्नीसुरक्षेचे नियमभंग करणारी भिवंडी येथील २ औद्योगिक आस्थापने ‘सील’ !
परळी (बीड) येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन !