
सातारा, २४ मार्च (वार्ता.) – कृषी विभागाने शेतकर्यांना लाभ देतांना शासनाने घालून दिलेल्या निकषांचे सर्व तालुक्यांमध्ये समान पद्धतीने पालन करणे बंधनकारक आहे. कोणत्याही पात्र शेतकर्याला लाभापासून वंचित ठेवू नये, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदे’च्या बैठकीत ते बोलत होते.
अपर जिल्हाधिकारी माने म्हणाले, ‘‘अनेक शेतांमध्ये विद्युत् तारा भूमीलगत किंवा पुष्कळ खाली आल्या आहेत. यामुळे जीवितहानी किंवा मोठे अपघात घडण्याची शक्यता आहे. ‘महावितरण’ने तातडीने या तारा उंच करण्याचे काम हाती घ्यावे.’’
शहरातील विस्कळीत वाहतूक सुरळीत करण्यासाठी बंद असलेली सिग्नल यंत्रणा तात्काळ कार्यान्वित करावी. गोडोली ते मोळाचा ओढा या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. ही अतिक्रमणे काढून रस्ता मोकळा करावा, जेणेकरून वाहतूककोंडीची समस्या सुटेल.’’
या बैठकीत ‘ग्राहक संरक्षण परिषदे’च्या अशासकीय सदस्यांनी विविध समस्या मांडल्या. यावर ‘संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करून अहवाल सादर करावा’, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी श्री. माने यांनी दिले.
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !
शेतकर्यांच्या कर्जमुक्ती योजनेची कार्यवाही आता ऑनलाईन होणार !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
डॉक्टरांनी ८ सहस्र रुपये घेऊन हाड जोडले; पण उर्वरित रक्कम न मिळाल्याने ते पुन्हा तोडल्याचा आरोप !
धोकादायक इमारतीमधील रहिवास बंद करून त्या स्वतःहून पाडाव्यात !