महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन

मुंबई, २४ मार्च (वार्ता.) – तमिळनाडूमध्ये देशातील सर्वांत मोठा जहाजबांधणी प्रकल्प आहे. याहून मोठा प्रकल्प कोकणात उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांनी २४ मार्च या दिवशी अल्पकालीन चर्चेच्या उत्तरात दिले. लवकरच याविषयीचे अधिकृत धोरण घोषित करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोकणावरील अल्पकालीन चर्चेला उत्तर…
📍२४ मार्च २०२६ । विधानसभा, मुंबई@CMOMaharashtra @Dev_Fadnavis #VidhanBhavan #Mumbai #BudgetSession #NiteshRane pic.twitter.com/7NdtOEi2YR
— Nitesh Rane (@NiteshNRane) March 24, 2026
मंत्री नितेश राणे पुढे म्हणाले,
‘‘जहाजबांधणी प्रकल्पासाठी राज्यशासनाकडून ३ जागांची पहाणी करण्यात आली आहे. यासाठी भूमी अधिग्रहणाचे काम चालू आहे. येत्या काही वर्षांत जहाज बांधणी आणि दुरुस्ती यांमध्ये देशात महाराष्ट्र अग्रेसर असेल. नुकत्याच घोषित झालेल्या अर्थसंकल्पामध्ये जलवाहतुकीसाठी ६ सहस्र ६०० कोटी रुपये घोषित करण्यात आले आहेत. विजयदुर्गमध्ये ३ सहस्र एकर भूमी बंदर विकासासाठी घेण्यात आली आहे. यासाठी ह्युंदाई आणि ॲक्युरेट आस्थापनांकडून प्रस्ताव आले आहेत. याविषयीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे.
देवगड (गिर्ये) येथे स्वतंत्र मत्स्य विद्यापीठ उभारण्याची प्रक्रिया चालू आहे. हे विद्यापीठ दापोली विद्यापिठाशी संलग्न केले जाणार आहे. वेंगुर्ला येथे ६० कोटी रुपये खर्च करून मत्स्यबीज उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. सद्यःस्थितीत १ कोटी ८ लाख नागरिक जलवाहतुकीचा वापर करत आहेत. अनधिकृत आणि इलेक्ट्रिक मासेमारी १०० टक्के बंद करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पारंपरिक मासेमारीला प्रोत्साहन देण्याची आमची भूमिका आहे. पारंपरिक मासेमारांचा अधिकार कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. मुंबई महानगरातील वाहतूक कोंडी न्यून करण्यासाठी येत्या काळात ‘वॉटर मेट्रो’चे (पाण्यावर चालणारी सार्वजनिक वाहतूक सेवा) जाळे उभारले जाईल.’’
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
जोगेश्वरीमध्ये ११ लाख रुपयांचा विनालेबल साबण जप्त !
‘डॉ. डी.वाय. पाटील बी-स्कूल’मध्ये आर्थिक अपव्यवहार प्रकरणी माजी संचालकाच्या विरोधात गुन्हा नोंद !
महाराष्ट्र विधीमंडळ स्वीकारणार केंद्रशासनाने विकसित केलेली ‘एकात्मिक डिजिटल प्रणाली’ !
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !