
सातारा, २२ मार्च (वार्ता.) – येथील माची पेठ परिसरात असणार्या आणि समस्त सातारावासियांचे ग्रामदैवत असणार्या श्री ढोल्या गणपति मंदिराच्या जीर्णोद्धार करण्याच्या कार्यास सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन माजी नगराध्यक्ष डॉ. अच्युत गोडबोले यांनी केले.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर श्री ढोल्या गणपति मंदिराच्या जिर्णोद्धार कार्याचा प्रारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या वेळी आरोग्य सभापती धनंजय जांभळे, नगरसेवक अविनाश कदम, राजू गोरे, प्रशांत आहेरराव, सागर पावशे, सौ. सिद्धी पवार, सौ. आशा पंडित, ‘बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट’चे प्रमुख विश्वस्त राजेंद्र चोरगे, ‘श्री ढोल्या गणपति मंदिर ट्रस्ट’चे विश्वस्त राजन सबनीस आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. गोडबोले म्हणाले, ‘‘मंदिराचे नूतनीकरणाच्या कार्यासाठी राजघराण्यातील खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, मंत्री श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले, श्री. वृषालीराजे भोसले, श्री. सत्वशीलाराजे अक्षोभसिंह सिंग आणि आदालत वाडा येथील राजे भोसले घराण्यातील मान्यवर व्यक्तींनी मंदिर जीर्णोद्धारासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची सिद्धता दर्शवली आहे. प्रत्येक सातारावासियाने तन-मन-धन अर्पून हे कार्य लवकरात-लवकर पूर्ण होण्यासाठी पुढे यावे.’’
प्रवाशांना नेहमी स्वच्छ आणि वापरण्यायोग्य सुविधा उपलब्ध करून द्या !
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे सखोल सर्वेक्षण करून उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करा ! – मुख्यमंत्री
कर्नाटकात शाळांजवळ पिझ्झा-बर्गर यांच्या विक्रीवर लवकरच बंदी !
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद