हिंदु जनजागृती समिती आणि मंदिर महासंघ यांच्या वतीने पुणे येथे ठिकठिकाणी ‘गुढीपाडव्या’विषयी प्रवचने, तसेच प्रात्यक्षिकांद्वारे प्रबोधन !

पुणे – गुढीपाडवा म्हणजेच नववर्षाचा प्रारंभदिन पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील कसबा पेठ, आळंदेवाडी, केंजळ, पारगाव (सालू-मालू), श्री शिरसाईमाता मंदिर गोकवडी, पौड, मोई गाव, उर्से, श्री राधाकृष्ण मंदिर, तुकाईटेकडी, काळेपडळ, हडपसर, आढे मावळ आदी अनेक ठिकाणी हिंदु जनजागृती समिती आणि मंदिर महासंघ यांच्या वतीने, ‘सामूहिक गुढीपूजन’ करण्यात आले.
या वेळी श्री राधाकृष्ण मंदिर, तुकाई टेकडी, काळेपडळ, हडपसर येथे सनातनच्या संत पू. (सौ.) मनीषा पाठक यांची वंदनीय उपस्थिती लाभली. हिंदु जनजागृती समितीकडून पुणे जिल्ह्यातील शाळा, सोसायटी, तसेच मंदिरांमध्ये गुढीपाडव्याविषयी प्रवचन घेण्यात आले. या वेळी ‘गुढी कशी उभारावी ?’ याचे प्रात्यक्षिकाद्वारे प्रबोधन करण्यात आले. ठिकठिकाणी फलकप्रसिद्धीच्या माध्यमातून गुढीपाडव्याविषयी माहिती देण्यात आली. यामध्ये स्थानिक नागरिक उत्स्फूर्तरित्या सहभागी झाले.
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
मोशी (पुणे) कचरा दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार !