
ठाणे – हिंदु नववर्षानिमित्ताने राज्यभर मोठ्या उत्साहात अनेक ठिकाणी स्वागतयात्रा पार पडल्या. ठाणे, गिरगाव आणि विलेपार्ले येथे झालेल्या नववर्ष स्वागतयात्रांमध्ये रामसेतूची संकल्पना साकारत हातात प्रतिकात्मक शिळा घेऊन सनातन संस्थचे साधक सहभागी झाले होते. राज्यासह मुंबई, पुणे, ठाणे आदी ठिकाणी हिंदु नववर्षाचे मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक जल्लोषात स्वागत करण्यात आले. प्रतीवर्षी प्रमाणे यंदाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे येथील शोभायात्रेत उपस्थित होते.
मान्यवरांना दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा !

ठाणे येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर, भाजपचे आमदार निरंजन डावखरे आणि नगरसेवक सुनेश जोशी यांना, तर डोंबिवली येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजपचे कल्याण प्रांत सरचिटणीस नंदकिशोर परब, शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, नगरसेविका ज्योती मराठे यांना दैनिक ‘सनातन प्रभात’चा गुढीपाडवा विशेषांक भेट देऊन सनातन संस्थेच्या वतीने नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
सनातन संस्थेच्या वतीने रामसेतूच्या संकल्पनेसहित स्वागत यात्रेत सहभाग !
राज्यात सर्वत्रच्या शोभायांत्रांमध्ये सनातन संस्थेचे साधक सहभागी झाले. ठाणे, गिरगाव आणि विलेपार्ले येथील स्वागतयात्रेमध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘शंखनाद रामराज्याचा’ ही संकल्पना चित्ररथाच्या माध्यमातून साकारण्यात आली. ‘ज्याप्रमाणे रामसेतू बांधण्यासाठी एकएक शिळा वानरसेनेने समुद्रात टाकून रामसेतू बांधला, त्याचप्रमाणे रामराज्याच्या निर्मितीसाठी आपणही धर्मकार्यात सहभागी होऊया’ असा संदेश या माध्यमातून देण्यात आला. ‘धर्म’, ‘संस्कृती’, ‘परंपरा’, ‘श्रद्धा’, ‘भक्ती’, ‘साधना’, ‘त्याग’, ‘राम’ असे शब्द लिहिलेल्या प्रतिकात्मक शिळा खांद्यावर घेऊन रामनामाचा जप करत मार्गक्रमण करणारे साधक नागरिकांचे विशेष आकर्षण ठरले. स्वरक्षण प्रशिक्षणाचे गांभीर्य लक्षात आणून देत लाठीकाठी आणि नानचाकू यांची प्रात्यक्षिके या वेळी दाखवण्यात आली.
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अ.भा.वि.प. शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी ! – अथर्व कुलकर्णी, अ.भा.वि.प.
अजित पवार यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयांमध्ये साजरी होणार !
पुणे जिल्ह्यातील ज्ञात-अज्ञात पर्यटन स्थळांची माहिती पाठवण्याचे पर्यटन संचालनालयाचे आवाहन !
यंदा पालखी सोहळ्यात ५३ सहस्र वारकर्यांनी घेतला पुणे महापालिकेच्या आरोग्य सेवेचा लाभ !
केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडून श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या कामाची पहाणी !