लव्ह जिहादविरुद्ध जागृती आणि शपथ

बेंगळुरू (कर्नाटक) – गदग येथील ‘क्रांती सेना गदग’ आणि ‘राजराजेश्वरी महिला मंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात ‘द केरळ स्टोरी २’ या चित्रपटाचे विशेष निःशुल्क प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाचा लाभ गदग जिल्ह्यातील सुमारे ६५० हिंदु तरुणींनी घेतला. चित्रपट पाहिल्यानंतर उपस्थित तरुणींना लव्ह जिहादच्या संकटापासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले, तसेच या संकटात अडकलेल्या इतर मुलींना वाचवण्यासाठी सामूहिक शपथ देण्यात आली. यावेळी ‘क्रांती सेना गदग’चे जिल्हाध्यक्ष श्री. बाबू बाकळे आणि ‘क्रांती सेना गदग’च्या जिल्हा महिला अध्यक्षा श्रीमती राणी रा. चंदावरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
🎬 Free Screening of “The Kerala Story 2” for 650 Young Women in Gadag (Karnataka)
⚠️ Awareness Raised on “Love Jihad” & Collective Oath Taken
🗣️ After watching the film, many young women shared their concerns: Friendship is being misused as a trap to target Hindu girls.
🚨 In… https://t.co/6MdZAxpPqi pic.twitter.com/y5djzHTRKy
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 21, 2026
संस्कारांची शिदोरी आवश्यक ! – माता-भगिनींचे मत
चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या पालक आणि मात यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करतांना सांगितले की, सध्याच्या काळात मुलांवर बालपणापासूनच योग्य संस्कार करणे आवश्यक झाले आहे. आपल्या मुलांना हिंदु संस्कृती, परंपरा आणि धर्म यांचे महत्त्व पटवून दिले तरच अशा संकटांना थोपवता येईल.
तरुणींनी केला सावध राहण्याचा निर्धार !
चित्रपट पाहिल्यानंतर अनेक तरुणींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. ‘केवळ मैत्रीच्या बहाण्याने हिंदु मुलींना जाळ्यात ओढले जात आहे. आजच्या परिस्थितीकडे पहाता आम्ही सावध रहाणे आवश्यक आहे’, असे मत तरुणींनी मांडले. या प्रदर्शनामुळे समाजात जनजागृती होण्यास मोठे साहाय्य झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !