
१. चैत्र शुक्ल प्रतिपदेला प्रभु श्रीरामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले. तो हा विजयोत्सवाचा दिवस ! वाली आणि आसुरी शक्ती यांचा दैवी शक्तीच्या साहाय्याने रामाने नाश केला. ‘गुढी’ ही याचे सूचक आहे.

२. याच दिवशी प्रभु श्रीरामाचा १४ वर्षांचा वनवासही संपला; म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस ! विजय मिळवून परणार्या श्रीरामाच्या स्वागतासाठी प्रजाजनांनी गुढ्या उभारल्या, तसेच घरोघरी तोरणे उभारली होती.

३. याच दिवशी ‘शालिवाहन’ नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी मातीच्या ६ सहस्र सैनिकांचे पुतळे बनवले आणि त्यात प्राण ओतून त्यांच्या साहाय्याने शकांचा पराभव केला. शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना म्हणजेच ‘शालिवाहन शक’ चालू केले.
– श्री. मिहीर जोहारी, पुणे.
‘स्मार्ट’ फसवणूक !
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी न्यायालयीन संघर्ष
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
प्रेमप्रकरण कि हृदयातील कपट ?
डेन्मार्कला जे जमले, ते भारताला जमेल का ?