भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे यांचा गुढीपाडव्याच्या निमित्ताने संदेश

सध्या रशिया-युक्रेन, पाकिस्तान-अफगाणिस्तान, इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्ध चालू आहे. या युद्धाचे रूपांतर तिसर्या महायुद्धात केव्हा होईल, हे सांगता येत नाही. आता चालू असलेल्या इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्धामुळे भारतात गॅस अन् इंधन तुटवडा जाणवणे, उपाहारगृहे बंद पडणे आदी देशातील अर्थकारणावर आणि सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणार्या कृती होऊ लागल्या आहेत. याचाच अर्थ तिसर्या महायुद्धाचे पडघम वाजू लागले. वरकरणी दिसतांना अनेक राष्ट्रांमध्ये युद्ध होत असले, तरी प्रत्यक्षात हा लढा धर्म-अधर्म यांच्यातील आहे. त्यामुळे आगामी काळात भारतालाही या युद्धांची झळ बसणार असून त्यात त्याला सहभाग घ्यावा लागणार आहे. त्यामुळे हिंदूंनी आतापासूनच संघटित राहून धर्माच्या बाजूने रहाण्याची सिद्धता करायला हवी. आता सिद्धता म्हणजे काय, तर आतापासूनच भारताचा युद्धात विजय होण्यासाठी प्रभु श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांना प्रार्थना करणे, स्वतःचे रक्षण होण्यासाठी नामजपादी साधना करत धर्माचरण करणे, शासनाचे आदेश पाळणे; आपल्या समाजबांधवांना साहाय्य होईल आणि त्यांचे संरक्षण होईल, असे आचरण करणे महत्त्वाचे आहे. भारतीय परंपरेत शिस्त, म्हणजे केवळ कायद्याचे पालन नसून धर्मशास्त्रात याला ‘सामान्य धर्म’ असे म्हटले आहे. नागरी शिस्त पाळायला हवी. लक्षात घ्या, ‘धर्मो रक्षति रक्षितः ।’, असे शास्त्रवचन आहे. याचा अर्थ आहे; ‘जो अधर्माने वागतो, त्याचा नाश होतो, तर जो धर्माचे रक्षण करतो, त्याचे धर्म (ईश्वर) रक्षण करतो.’ यानुसार आचरण करण्याचा संकल्प हिंदूंनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने करावा, तसेच ‘प्रभु श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण आपल्या सर्वांना सद्बुद्धी देवो’, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना !
– भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.३.२०२६)
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !