उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. अन्वी अमित हरेर ही या पिढीतील एक आहे !
(‘वर्ष २०२६ मध्ये कु. अन्वी अमित हरेर हिची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के आहे.’ – संकलक)

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा त-हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘कु. अन्वी अमित हरेर हिची तिच्या आईच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. ‘ती पुष्कळ स्थिर आणि आनंदी असते.
२. व्यवस्थितपणा
‘आपले घर स्वच्छ आणि सुंदर असावे’, असे तिला मनापासून वाटते. ती तिच्या घराभोवतीचा परिसरही स्वच्छ ठेवण्याचा काटेकोर प्रयत्न करते. ती नेहमी स्वतःची पुस्तके आणि दप्तर जागेवर ठेवते. तिने चित्र काढल्यावर किंवा शोभेच्या वस्तू बनवल्यानंतर ती रंग, पेन, पेन्सिल आणि ब्रश इत्यादी सर्व साहित्यही न चुकता जागेवर ठेवते.

३. काटकसरी
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले बस तिकिटाची पाठकोरी बाजूही वाया न घालवता त्याचा वापर करतात’, असे आम्ही एकदा तिला सांगितले. ती ५ वर्षांची असल्यापासून तिचे सर्व साहित्य, रंग आणि पेन्सिल जपून वापरते.
४. वेळेचा सदुपयोग करणे
अ. अन्वी प्रतिदिन शाळेत जातांना नामजप करते, तसेच शाळेत एखाद्या तासाला शिक्षक आले नसतील, तर ती त्या वेळी मैत्रिणींशी गप्पा मारण्यात वेळ वाया न घालवता नामजप करते.
आ. तिच्या मावशीने तिला नामजप करण्यासाठी ‘काउंटर’ (नामजप मोजण्याचे यंत्र) दिला आहे. त्याचा ती बर्याचदा वापर करते. आम्ही प्रवास करत असतांना ती ‘काउंटर’ वर नामजप करते.

५. सेवेची आवड
ती इतर मुलांना बालसंस्कार वर्गात येण्यासाठी प्रोत्साहन देते. ती बालसंस्कार वर्गात प्रार्थना सांगते.
६. ती आजारी असतांना आयुर्वेदीय, तसेच घरगुती औषधे आवडीने घेते. ती साबणाच्या ऐवजी बेसन आणि केस धुण्यासाठी आयुर्वेदीय उत्पादने प्राधान्याने वापरते.
७. राष्ट्रप्रेम
‘भारतीय बनावटीच्याच वस्तू विकत घेऊया’, असा तिचा आग्रह असतो.
८. सुंदर चित्रे रेखाटणे
ती श्रीकृष्ण आणि देवी यांची सुंदर चित्रे रेखाटते. ती निसर्गचित्रेही रेखाटते. तिने काढलेल्या चित्रांतील रंगसंगती सात्त्विक असते.
९. ‘अन्नपदार्थ वाया जाऊ नये’, यासाठी आदल्या दिवशीचे उरलेले शिळे अन्न खाण्याची तिची सिद्धता असते.
१०. ती घरात गोमूत्र शिंपडून घराची शुद्धी करते.
११. स्वभावदोष : राग येणे, तुलना करणे आणि हट्टीपणा.’
– सौ. स्वाती अमित हरेर (अन्वीची आई), मुंबई, (२०.१.२०२६)
| बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |
| • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक |
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।
आनंदी आणि संत अन् गुरुदेव यांच्याप्रती भाव असलेला ५८ टक्के आध्यात्मिक पातळीचा भोसरी (पुणे) येथील कु. समीहन (कान्हा) संदीप कुलकर्णी (वय ७ वर्षे) !
प.पू. गजानन महाराजांनी साधकाला प्रत्यक्ष दर्शन देऊन श्री गुरुचरित्राचे पारायण करण्यास सांगणे आणि ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच प.पू. गजानन महाराज यांच्या रूपात दर्शन दिले’, असे वाटणे
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी भक्तीसत्संगात ‘स्वीकारण्याची वृत्ती’ या विषयावर केलेले मार्गदर्शन ऐकून साधिकेने केलेले प्रयत्न आणि तिला झालेले लाभ !
हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अंतर्गत सेवा करतांना अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी यांनी गुणवृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे !
विदेशातील रज-तम वातावरणात राहूनही शेवटच्या क्षणापर्यंत साधना करणार्या मोझांबिक (आफ्रिका खंड) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सरलाबाय जसवंतलाल रघुवंशी (वय ८७ वर्षे) !