
नवी मुंबई, १५ मार्च (वार्ता.) – राज्य शासनाच्या मराठी भाषा विभाग यांच्या वतीने ‘बाल मराठी संमेलन’ १६ आणि १७ मार्च या दिवशी वाशीमधील ‘सिडको प्रदर्शन केंद्र’ येथे आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीमती सुनेत्रा पवार उपस्थित रहाणार आहेत. मराठी बालसाहित्य आणि साहित्यिक यांच्या प्रतिभेला व्यासपीठ निर्माण करून देणार्या या उपक्रमात नागरिकांनी, विशेषतः विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत केले.
मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती यांची गोडी लहानपणापासून मुलांमध्ये निर्माण व्हावी, त्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळावे आणि मराठी भाषेचे संस्कार पुढील पिढीत रुजावेत, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या भव्य संमेलनासाठी ‘स्व. दि. बा. पाटील मुख्य मंच’ आणि ‘डॉ. जयंत नारळीकर उपमंच’ असे २ स्वतंत्र मंच उभारण्यात आले असून दोन्ही मंचांवर मुलांसाठी विविध सांस्कृतिक, साहित्यिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
१६ मार्च या दिवशी सकाळी ८.३० ते ११ वाजता वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सिडको प्रदर्शन केंद्र येथपर्यंत शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर बालनाट्य: ‘लिझल’स सिक्रेट, उद्घाटन समारंभ, बालसाहित्य आविष्कार, परिसंवाद : बालक – पालक मानसिकता – सहभाग अच्युत पालव, सुलेखनकार, डॉ. सदानंद मोरे, प्रा. मिलिंद जोशी (अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ), ॲड. नीलम शिकर्े – सामंत (अध्यक्ष, बालरंगभूमी परिषद, महाराष्ट्र), मीना नाईक (ज्येष्ठ अभिनेत्री, दिग्दर्शिका), संध्या देवरुखकर (राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्कार) त्यानंतर माकडचाळे हे नाटक सादर करण्यात येणार आहे.
परिसंवाद : बोलीभाषा आणि बालक- सहभाग डॉ. रवींद्र शोभणे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ), अपूर्वा झोळगीकर, छ. संभाजीनगर (सृजनशील लेखनासाठी भारत सरकारचा बालश्री पुरस्कार), ऋषीकेश खिलारे, अमरावती (आदिवासींच्या बोलींचे अभ्यासक), आनंद बोंद्रे, रत्नागिरी (संगमेश्वरी बोली), दिगंबर नाईक, मुंबई (मालवणी बोली)
दु.३.१५ ते ४.१५ परिसंवाद : बालकांचा कला विश्वातील सहभाग, संवादक – बाळकृष्ण ओडेकर, गोविंद गोडबोले, मिरज (ज्येष्ठ रंगकर्मी), अरुण पटवर्धन, पुणे (बालनाट्य लेखक आणि दिग्दर्शक), संजय हळदीकर (ज्येष्ठ बालनाट्य प्रशिक्षक आणि परीक्षक), राधिका देशपांडे, पुणे (महा बालनाट्य दिग्दर्शिका), प्रकाश पारखी, राजीव तुलालवार, मुंबई, (व्यावसायिक बालनाट्य निर्माता व दिग्दर्शक), वृषांक कवठेकर, डोंबिवली, (राज्य बालनाट्य सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक), अग्गोबाई – ढग्गोबाई (सलील कुलकर्णी (गीतकार) व संदीप खरे (कवी)
मोरगाव (पुणे) येथे ‘हरि ॐ तत्सत्’ परिवार, फोंडशिरस (ता. माळशिरस) यांच्याकडून ३३ आदर्श माता-पित्यांचा सत्कार !
गडचिरोलीतील खाण प्रकल्प रहित करावेत ! – आदित्य ठाकरे, नेते, ठाकरे गट
नागपूर येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीवरील सोन्याची साखळी चोरणार्या ३ धर्मांधांना अटक !
विधान परिषदेमध्ये महायुतीचे ५ उमेदवार बिनविरोध विजयी !
बसस्थानके आणि बसगाड्या यांची प्रत्येक ४ घंट्यांनी स्वच्छता होणार ! – परिवहनमंत्री
गोव्यात मौसमी पावसाचे आगमन