उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. अनय अमित हरेर हा या पिढीतील एक आहे !
(‘वर्ष २०२६ मध्ये कु. अनय अमित हरेर याची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के आहे.’ – संकलक)
कु. अनय अमित हरेर याची त्याच्या आईच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. प्रेमभाव
अ. ‘अनय आजी-आजोबांना साहाय्य करतो.
आ. तो माझी प्रकृती ठीक नसतांना माझी पाठ आणि पाय चेपून देतो.
ई. त्याला प्राणी आणि वयस्कर व्यक्ती यांच्याविषयी प्रेम वाटते.
२. इतरांना साहाय्य करणे

अनय अभ्यासात मागे असणार्या आणि इंग्रजी भाषा नीट न समजणार्या वर्गमित्रांना प्रोत्साहन देऊन त्यांना साहाय्य करतो. तो वर्गप्रमुख असतांना मुलांना येणार्या अडचणीत त्यांना साहाय्य करतो.
३. ऐकण्याची वृत्ती
अ. त्याला ‘त्याच्या लाजर्या स्वभावावर मात करता यावी’, यासाठी आम्ही त्याला ‘नेतृत्व कसे सर्वसमावेशक असायला हवे ?’, याची काही उदाहरणे सांगितली. त्यानुसार त्याने प्रयत्न करून नेतृत्वाचे अनेक पैलू आत्मसात केले आहेत.
आ. तो त्याला ठरवून दिलेल्या वेळेतच दूरचित्रवाणी पहाण्याचा प्रयत्न करतो. त्याने कधी अधिक वेळ दूरचित्रवाणी पाहिल्यास त्याला त्याविषयी खंत वाटते. नंतर तो वाया गेलेला वेळ भरून काढण्यासाठी प्रयत्न करतो.
४. देशप्रेम
त्याला क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांच्याविषयी पुष्कळ आदर वाटतो. त्याचा नेहमी स्वदेशी उत्पादने घेण्यासाठी आग्रह असतो.
५. तो शाळेत मन लावून अभ्यास करतो. त्याचे सर्व शिक्षक ‘हा मुलगा सद्गुणी आहे’, असे सांगतात.
६. चिकाटी
अनय चिकाटीने ‘फूटबॉल’ खेळण्याचा सराव करतो. त्याला चांगला फूटबॉल खेळाडू व्हायचे आहे.
७. सात्त्विक पोशाख परिधान करणे
त्याला ‘सदरा आणि पायजमा हा भारतीय पोशाख आहे’, असे सांगितल्यावर तो कार्यक्रमात नेहमी सदरा घालतो.
८. तो बाहेर जातांना ‘हरि ओम’ म्हणतो.
९. तो अभ्यास करण्यापूर्वी आणि प्रश्नपत्रिका सोडवण्यापूर्वी देवाला प्रार्थना करतो. तो अभ्यास पूर्ण झाल्यावर कृतज्ञताही व्यक्त करतो.
१०. ‘ईश्वर आपल्याला पहात असतो’, असा त्याचा भाव असतो.
४. स्वभावदोष : राग येणे’
– सौ. स्वाती अमित हरेर (कु. अनयची आई), मुंबई (२०.१.२०२६)
| यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक |
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।
आनंदी आणि संत अन् गुरुदेव यांच्याप्रती भाव असलेला ५८ टक्के आध्यात्मिक पातळीचा भोसरी (पुणे) येथील कु. समीहन (कान्हा) संदीप कुलकर्णी (वय ७ वर्षे) !
प.पू. गजानन महाराजांनी साधकाला प्रत्यक्ष दर्शन देऊन श्री गुरुचरित्राचे पारायण करण्यास सांगणे आणि ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच प.पू. गजानन महाराज यांच्या रूपात दर्शन दिले’, असे वाटणे
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी भक्तीसत्संगात ‘स्वीकारण्याची वृत्ती’ या विषयावर केलेले मार्गदर्शन ऐकून साधिकेने केलेले प्रयत्न आणि तिला झालेले लाभ !
हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अंतर्गत सेवा करतांना अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी यांनी गुणवृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे !
विदेशातील रज-तम वातावरणात राहूनही शेवटच्या क्षणापर्यंत साधना करणार्या मोझांबिक (आफ्रिका खंड) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सरलाबाय जसवंतलाल रघुवंशी (वय ८७ वर्षे) !