साधक, वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी महत्त्वाची माहिती !
आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीने १ एप्रिल ते ३१ मार्च, असे आर्थिक वर्ष निर्धारित करण्यात आले आहे. (पुढील आर्थिक वर्ष १.४.२०२६ ते ३१.३.२०२७ या कालावधीत आहे.)
‘टी.डी.एस्. (TDS – Tax Deducted At Source) कपात होऊ नये’, यासाठी पुढील आर्थिक वर्षासाठी 15G किंवा 15H यांपैकी एक फॉर्म (अर्ज) भरून देण्याच्या संदर्भातील महत्त्वाच्या सूचना पुढे दिल्या आहेत.

१. आर्थिक वर्षाच्या आरंभी सर्वांनी ‘अधिकोषात आपला पॅनकार्ड क्रमांक नोंदवला गेला आहे ना ?’, याची निश्चिती करावी. तो नोंदवला नसेल, तर ‘टी.डी.एस्.’ म्हणून २० टक्के रक्कम व्याजातून कापली जाते.
२. 15G फॉर्म
अ. ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा अल्प असेल आणि आर्थिक वर्षातील अंदाजे एकूण उत्पन्न (विविध ठेवींवर मिळणारे व्याज धरून) करमुक्त मर्यादेपेक्षा (४ लक्ष रुपयांपेक्षा) अल्प असेल, त्यांनी 15G फॉर्म भरावा.
आ. ‘जर वय ६० वर्षांपेक्षा अल्प असेल आणि विविध ठेवींवर मिळणारे व्याज हे आर्थिक वर्षात ५० सहस्र रुपयांपेक्षा अल्प असेल, तर ‘टी.डी.एस्.’ कपात होत नाही’, असा नियम आहे.
३. 15H फॉर्म
अ. ज्यांचे वय ६० वर्षे आणि त्यापेक्षा अधिक असेल अन् आर्थिक वर्षातील एकूण अंदाजे उत्पन्नावर भरावा लागणारा कर शून्य (Nil Tax) असेल, तर त्यांनी 15H फॉर्म भरावा.
आ. ‘वय ६० वर्षे आणि त्यापेक्षा अधिक असेल अन् विविध ठेवींवर मिळणारे व्याज हे आर्थिक वर्षात १ लक्ष रुपयांपेक्षा अल्प असेल, तर ‘टी.डी.एस्.’ कपात होत नाही’, असा नियम आहे.
इ. आर्थिक वर्ष २०२६ – २७ साठी ३१ मार्च २०२६ पर्यंत कुठल्याही दिवशी वय ६० वर्षे पूर्ण होत असेल, तर 15H फॉर्म भरू शकतो.
४. काही जण जुन्या आयकर पद्धतीनुसार (Old Tax Regime) आयकर परतावा (Income tax return) भरतात. त्यांच्यासाठी करमुक्त उत्पन्नाची मर्यादा पुढीलप्रमाणे आहे.
अ. वय ६० वर्षांपेक्षा अल्प असणार्यांसाठी : २ लाख ५० सहस्र
आ. वय ६० वर्षे आणि त्यापेक्षा अधिक असणार्यांसाठी : ३ लाख
इ. वय ८० वर्षे आणि त्यापेक्षा अधिक असणार्यांसाठी : ५ लाख
फॉर्म भरतांना ‘आपल्याला वरीलपैकी कोणता नियम लागू होतो ?’, याची निश्चिती करावी.
५. दोन्ही फॉर्मस्विषयी सामायिक माहिती
विविध अधिकोषांत कायम ठेवी असतील, तर प्रत्येक अधिकोषात 15G अथवा 15H हे फॉर्म भरावे लागतात. एका अधिकोषाच्या एकापेक्षा अधिक शाखांमध्ये ठेवी असल्यास प्रत्येक शाखेत वेगळा फॉर्म भरून द्यावा लागतो.
15G अथवा 15H हे दोन्ही फॉर्म अधिकोषात अथवा पोस्टाच्या शाखेत उपलब्ध असतात. खातेधारकाला प्रत्येक फॉर्मच्या २ अथवा ३ प्रती (कॉपीज्) भरून अधिकोषात जमा कराव्या लागतात आणि त्यातील एक प्रत पावती (Aknowledgement) म्हणून आपल्याकडे घेऊन ठेवावी. प्रत्येक अधिकोषाने स्वतःच्या नियमावलींच्या दृष्टीने दोन्ही फॉर्म्सच्या आराखड्यामध्ये (लेआऊटमध्ये) थोडेफार पालट केलेले असल्याने खातेधारकाचे ज्या अधिकोषात खाते आहे, तेथूनच फॉर्मस् आणून ते भरावे लागतात.
काही अधिकोषांकडून 15G अथवा 15H हे फॉर्म ‘ऑनलाईन’ भरण्याची सुविधा देण्यात येते. त्यासाठी संबंधित अधिकोषाचे ‘नेटबँकिंग’ असल्यास त्याद्वारेही या सुविधेचा लाभ घेता येऊ शकतो, तसेच संबंधित अधिकोषांच्या संकेतस्थळावर हे फॉर्म्स उपलब्ध असतील, तर ते ‘डाऊनलोड’ करून त्यांची ‘प्रिंट’ काढून त्यात सर्व माहिती भरून ते अधिकोषात जमा करू शकतो.
६. ‘टी.डी.एस्.’ कपात झाल्यास करायची कृती
कापण्यात आलेल्या ‘टी.डी.एस्.’ची रक्कम खातेधारकाला परत हवी असल्यास ज्या आर्थिक वर्षात करकपात झाली, त्या वर्षाचे ‘आयकर विवरण पत्रक’ आयकर विभागाला सादर करावे लागते. आयकर विभाग खातेधारकाची माहिती पडताळतो आणि कापलेला ‘टी.डी.एस्.’ व्याजासहित परत देतो.
ही सूत्रे लक्षात घेऊन ‘टी.डी.एस्. कपात होऊ नये’, यासाठी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात वरील प्रक्रिया पूर्ण करावी. (६.३.२०२६)
| नवीन आयकर प्रक्रियेमध्ये पालटांचा भाग म्हणून १ एप्रिल २०२६ पासून 15G फॉर्म आणि 15H फॉर्म हे पालटून त्या जागी केवळ एकच फॉर्म (फॉर्म १२१) असणार आहे. या वर्षी 15G अथवा 15H फॉर्म भरण्याआधी संबंधित अधिकोषात ‘फॉर्म १२१’ विषयी विचारून ‘कोणता फॉर्म भरायचा आहे ?’, याची निश्चिती करावी. |
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
डॉक्टरांना (आधुनिक वैद्यांना) मारून कुणाचा जीव वाचणार ?
हिंदूंना शत्रूबोध नाही !
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !