गोमंतकीय हिंदूंची अनेक वर्षांची मागणी पूर्ण

‘गड-दुर्ग संवर्धन प्राधिकरण’ स्थापन करण्याची मागणी
पणजी, ११ मार्च (पत्रक) – गोवा सरकारने ‘गोवा प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष कायदा, १९७८’ अंतर्गत फोंडा येथील ‘मर्दनगड’ आणि जुने गोवे येथील ‘हातकातरो खांब’ या ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण अन् संवर्धन करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. हिंदु जनजागृती समिती याविषयी गोवा सरकारचे मनापासून अभिनंदन करते. गोमंतकातील हिंदूंची अनेक वर्षांपासूनची मागणी सरकारने पूर्ण केली आहे, अशी प्रतिक्रिया हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. सत्यविजय नाईक यांनी दिली आहे.

श्री. नाईक पुढे म्हणाले, ‘‘फोंडा येथील मर्दनगड हा छत्रपती संभाजी महाराज यांनी बांधलेला गोव्यातील एकमेव गड आहे. हा गड महाराजांचे शौर्य आणि धैर्य यांचे प्रतीक आहे. गोव्यातील सर्व गडकिल्ले, तसेच गडकिल्ल्यांचा इतिहास आणि संस्कृती यांचे संवर्धन करून हा ऐतिहासिक ठेवा भावी पिढीपर्यंत पोचवणे यांसाठी ‘मर्दनगड संवर्धन समिती’ने पुढाकार घेतला आहे. हिंदु जनजागृती समिती ‘मर्दनगड संवर्धन समिती’मध्ये सक्रीय सहभागी आहे. ‘मर्दनगड संवर्धन समिती’च्या मोहिमेला लाभलेले हे यशच आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानदिनाच्या (१८ मार्चच्या) आधी सरकारने केलेली ही घोषणा छत्रपती संभाजी महाराजांना खर्या अर्थाने श्रद्धांजली आहे.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनीदेखील गोवा सरकारचे अभिनंदन करत म्हटले की, जुलमी पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी गोमंतकातील हिंदूंवर केलेल्या अनन्वित अत्याचाराची ‘हातकातरो खांब’ ही गोव्यातील एकमेव साक्ष आहे. या ‘हातकातरो खांबा’चे ऐतिहासिक वारसा म्हणून जतन आणि संरक्षण व्हावे, यासाठी हिंदु जनजागृती समिती गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नरत आहे. ‘हातकातरो खांब’ संरक्षित स्मारक व्हावे, यासाठी समितीने आतापर्यंत शेकडो निवेदने दिली, अनेक आंदोलने केली, पत्रकार परिषदा घेतल्या; गेल्या ‘गोवा क्रांतीदिनी’ हातकातरो खांबाच्या ठिकाणी गोवा मुक्तीलढ्यात हुतात्मा झालेल्या क्रांतीकारकांना श्रद्धांजली वहात या विषयाकडे गोवा सरकार, पुरातत्व खाते, इतिहासप्रेमी आदींचे लक्ष वेधून घेतले होते. ‘मर्दनगड’ आणि ‘हातकातरो खांब’ संरक्षित स्मारके घोषित करण्याचा सरकारने घेतलेला निर्णय हा हिंदु जनजागृती समितीसह गोमंतकातील हिंदु संघटनांनी उभारलेल्या लढ्याचे यशच आहे.
सरकारने मर्दनगडाचा इतिहास लवकरात लवकर अधिसूचित करावा. ‘हातकातरो खांब’ आणि ‘मर्दनगड किल्ला’ यांचा इतिहास दर्शवणारे फलक त्या परिसरात लावावेत, या दोन्ही स्मारकांच्या इतिहासाचा समावेश पाठ्यपुस्तकात करावा आणि गोव्यात स्वतंत्र ‘गड-दुर्ग संवर्धन प्राधिकरण’ स्थापन करावे, अशी मागणीही हिंदु जनजागृती समितीने केली आहे, असे श्री. नाईक म्हणाले.
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे डॉक्टर नदीमने कापली रुग्णाची चुकीची नस !
पारपत्रावरून नागरिकत्व सिद्ध होत नाही ! : Central Goverment